1 / 6सगळ्याच स्वयंपाकासाठी सरसकट एकाच प्रकारचं तेल वापरत असाल तर ते चुकीचं आहे. पदार्थानुसार कोणतं तेल वापरावं आणि कोणत्या पदार्थांना तूप लावावं याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.2 / 6प्रत्येक तेलामधले गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यानुसार जर आपण तेलाची निवड केली तर ते आपल्याच आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं. याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी dt.lavleen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.3 / 6यामध्ये आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की पराठा किंवा पोळ्या करताना त्याला तूप लावा. पण ते तूप पोळी किंवा पराठा तव्यावर असताना लावू नका. तर तव्यावरून आपण जेव्हा ती पोळी किंवा पराठा खाली उतरवतो, तेव्हा लावा. 4 / 6भाजी, वरण किंवा इतर पदार्थ करताना आपण जी फोडणी करतो त्यासाठी मोहरी, तीळ किंवा शेंगदाण्याचं तेल वापरावं. हे तेलसुद्धा घाण्याचं असावं. 5 / 6सलाडला जर फोडणी घालणार असाल तर ती ऑलिव्ह ऑईलची असावी. अशा पद्धतीने जर तुम्ही तेलाची विभागणी केली तर त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिड मिळतात.6 / 6सुर्यफुलाचं तेल, पाम ऑईल, व्हेजिटेबल ऑईल आपल्या आहारात नसावं असंही आहारतज्ज्ञ सांगतात.