तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

Updated:January 19, 2025 09:20 IST2025-01-19T09:19:54+5:302025-01-19T09:20:02+5:30

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

आरोग्य जपायचं तर खाद्यपदार्थांमध्ये तेल कमीतकमी प्रमाणात असावं, असं डॉक्टर वारंवार सांगतात. पण बऱ्याच जणींना असं वाटतं की जोपर्यंत आपण एखाद्या पदार्थात भरपूर तेल घालत नाही, तोपर्यंत त्या पदार्थाला काही चव येत नाही.

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

असंच तुम्हालाही वाटत असेल तर कमीतकमी तेल घालूनही चवदार पदार्थ कसे करायचे याविषयी काही खास टिप्स...

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नॉनस्टिक भांडी वापरायला सुरुवात करा. एकदा ही भांडी वापरायला सुरुवात केली की मग आपोआपच तेल कमी घालण्याची सवय लागेल.

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

तेल जास्त घातलं की पदार्थ कढईला चिटकत नाही. त्यामुळे अनेकजणी भरपूर तेल घालतात. तेल घालण्याऐवजी तुम्ही पाण्याचा वापर करून पाहा. पदार्थ भांड्याला चिटकणारही नाही आणि तेलही कमी लागेल.

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

भाज्या करताना आधी त्या उकडून घेतल्या आणि नंतर त्यांना फोडणी घातली तर कमी तेल लागेल. या भाज्यांमध्ये भरपूर मसाले घाला. त्यामुळे मग चवसुद्धा छान खमंग होईल.

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

पळीपळीने एकदम तेल ओतण्यापेक्षा ऑईल स्प्रे वापरा. यामुळे तेल कमी प्रमाणात वापरलं जाईल.