1 / 9उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आंबा आठवतो. आंब्याच्या सिझनमध्ये (How To Cut a Mango In Different Style) आपल्या सगळ्यांच्याच घरी अगदी आवर्जून आंबा विकत आणला जातो. 2 / 9आंबा पाहून आपल्याला तो कधी एकदा चिरुन खातो असे होते. आंबा चिरण्याची (How to Cut a Mango 7 Different Ways) प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आपण आंबा चक्क वेगवेगळ्या ७ पद्धतीने चिरु शकतो. यासाठीच, आंबा चिरण्याच्या कोणकोणत्या वेगळ्या पद्धती आहेत ते पाहूयात. 3 / 9ट्विस्ट अँड पूल या पद्धतीत तुम्ही आंबा आडवा धरून बरोबर मधून चिरून त्याचे दोन भाग करावेत. मग हे दोन्ही भाग हातात पकडून आंबा हलकेच थोडा ट्विस्ट करत फिरवून घ्यावा आणि मग एक भाग वरच्या दिशेने खेचावा अशा प्रकारे तुम्ही ट्विस्ट अँड पूल पद्धतीने आंबा चिरून खाऊ शकता. 4 / 9तुम्ही आंबा स्लाईस अँड स्कुप पद्धतीने देखील चिरु शकता. यासाठी सर्वात आधी आंबा कापून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्याव्यात. त्यानंतर चमचा त्यात गोलाकार पद्धतीने रोवून त्याचे मध्यम आकाराचे स्कुप पाडून घ्यावेत. 5 / 9 या पद्धतीत तुम्ही आंबा चिरण्यासाठी स्टीलच्या ग्लासचा वापर करु शकता. यासाठी, सर्वात आधी आंबा नेहमीप्रमाणे कापून त्याची मोठी फोड ग्लासच्या कडेवर धरुन गर सालीपासून वेगळा करून घ्यावा. 6 / 9 बरेचजण आंबा चिरण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. क्रिस क्रॉस पद्धतीमध्ये, आंबा चिरून त्याची एक मोठी पसरट अशी फोड घ्यावी. आता या आंब्याच्या फोडीवर सुरीने हलकेच दाब देत उभ्या व आडव्या रेषा मारुन घ्याव्यात. या उभ्या - आडव्या रेषांमुळे आंब्याच्या फोडींचे छोटे चौकोनी तुकडे तयार होतील. अशा प्रकारे आंबा खाण्याची चव खूप सुंदर लागते. आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करताना आपण अशा प्रकारे आंबा चिरून त्याची त्या डिशची सजावट करू शकता. 7 / 9बहुतेकजणांच्या घरी आंबा कापण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जातो. जर तुम्हाला आंब्याच्या फोडी खायच्या असतील तर तुम्ही देखील याच पद्धतीचा वापर करु शकता. यात आंब्याच्या फोडीचा आकार हा चंद्रकोर प्रमाणेच असतो, त्यामुळे त्याला हाफ मून असे म्हटले जाते. 8 / 9जर तुम्हाला आंबा खाताना त्याची सालं नको असेल तर तुम्ही या पद्धतीने आंबा चिरु शकता. यात सर्वात आधी आंबा स्वच्छ धुवून त्याची सालं काढायची. सालं संपूर्णपणे काढून झाल्यानंतर या आंब्यावर सुरीने उभ्या - आडव्या रेषा करून आंबा चिरून घ्यावा. 9 / 9बहुतेकांना आंबा खाण्याची ही पद्धत खूपच आवडते. या पद्धतीत आंबा देटाकडून चिरून त्याचा फक्त देटाकडील भाग चिरून घ्यावा. मग हलकेच हाताने दाब देत आंबा पिळून थोडा स्किविझ करत, आंबा खाण्याचा मनमुराद आनंद लुटावा. शक्यतो रस अधिक असणारे आंबे अशाच पद्धतीने खाल्ले जातात.