नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

Published:October 1, 2024 07:11 AM2024-10-01T07:11:13+5:302024-10-01T07:25:20+5:30

How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips : Navratri Is Just Two Days Away Prepare 8 Things In Advance For Fasting There Will Be No Rush : फराळाचे पदार्थ तयार करण्याची बेसिक तयारी आधीच करून ठेवली तर आयत्यावेळी घाईगडबड होत नाही....

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

नवरात्र सुरु होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. सगळीकडे उत्साहाचे आणि लगबगीचे वातावरण दिसत आहे. सगळ्यांच्याच घरी नवरात्रीची तयारी सुरु आहे. नवरात्री दरम्यान काहीजण उपवास करतात. या नऊ दिवसांच्या उपवासादरम्यान आपण फक्त उपवासाचे पदार्थ खात असतो. उपवासाचे पदार्थ खाताना देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. नाहीतर 'उपवासा दिवशी दुप्पट खाशी' या म्हणीच्या अर्थाला साजेसे वागून उपवासाच्या नावाने अरबट - चरबट पदार्थ खाल्ल्यास आपले पोट आणि आरोग्य दोन्ही बिघडू शकते. यासाठी उपवासा दरम्यान नऊ दिवस काहीही खाण्याआधी आपण काय खात आहोत याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. यासाठी उपवासाची तयारी करताना कोणते पदार्थ खायचे आहेत याची आधी थोडी पूर्वतयारी करुन ठेवली तर आयत्यावेळी गडबड होत नाही. यासोबतच पूर्वतयारी केली असल्यामुळे रोज उपवासाला काय पदार्थ तयार करायचा असा प्रश्न देखील पडत नाही. बेसिक तयारी केलेली असली की पटकन भूक लागली की काहीतरी तयार करुन खाता येत(How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips).

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

१. उपवासादरम्यान सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. उपवासादरम्यान कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की त्यात शेंगदाणे, दाण्याचा कूट आवर्जून घातले जाते. यासाठी नऊ दिवस पुरतील इतके शेंगदाणे एकदाच भाजून घ्या. त्यानंतर ते थोडे गार झाल्यावर अर्ध्या शेंगदाण्याचा कूट तर अर्धे भाजलेले शेंगदाणे एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावे. शेंगदाण्यांप्रमाणेच आपण मखाणे देखील कोरडे भाजून स्टोअर करून ठेवू शकता.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

२. वरईचा वापर करुन वरईचा भात, डोसा, खीर असे अनेक पदार्थ केले जातात. यासाठी पुरेशी वरई विकत आणून ती मंद आचेवर कोरडी भाजून डब्यांत भरुन ठेवा.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

३. हिरवी मिरची, जिरे यांची पेस्ट पुढील किमान ३ ते ४ दिवस पुरेल इतकी एकदाच करुन ठेवा. साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा इतर उपवासाचे पदार्थ तयार करताना आयत्यावेळी हिरव्या मिरचीची पेस्ट करण्यात वेळ वाया जाणार नाही.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

४. उपावसा दरम्यान मधल्या वेळेत भूक लागते या मधल्या छोट्या भुकेसाठी शेंगदाणे, फराळी चिवडा, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा, फळं, साबुदाण्याची चकली, गूळ - शेंगदाण्याचे लाडू असे हलके - फुकले पदार्थ तयार करुन ठेवा.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

५. उपवासासाठी रोज साबुदाणा खाणे शक्य होत नाही अशावेळी उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी पीठ किंवा भाजणी आधीच तयार करून ठेवावी.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

६. उपवासा दरम्यान शक्यतो आपण तेलाऐवजी तुपाचा जास्त प्रमाणात वापर करतो. अशावेळी ताजे तूप काढून एका कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावे.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

७. उपवास असताना साबुदाणा जास्त खाल्ला जात नाही. अशावेळी उपवासाच्या थालीपीठाची भाजणी, उपवासासाठी मिळणारी राजगिरा, शिंगाडा, वरई यांची पिठे आधीच दळून किंवा रेडीमेड आणून ठेवावीत.

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

८. उपवासादरम्यान घेता येईल अशी काही सरबते, नारळ पाणी, उसाचा रस, ताक, बासुंदी किंवा रबडीसारखे गोडाचे पदार्थ यांसारख्या गोष्टी लक्षात ठेवून वेळच्या वेळी आणाव्यात किंवा घरी कराव्यात. यामुळे शरीरातील साखर आणि मीठाचे प्रमाण चांगले राहून शरीरातील ताकद टिकून राहण्यास मदत होते.