Join us

ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखा घट्ट- दाटसरपणा येत नाही ? ७ टिप्स, ग्रेव्ही होईल परफेक्ट आणि चविष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 18:43 IST

1 / 8
रेस्टॉरंटस्टाईल स्टाईल परफेक्ट ग्रेव्हीच्या भाज्या (7 Ways to Thicken Gravy) खायला प्रत्येकालाच आवडतात. परंतु कितीही ठरवलं तरी घरात रेस्टॉरंट स्टाईलच्या भाज्या तयार करता येत नाहीत. रेस्टॉरंटस्टाईल मध्ये मिळते तशी भाजीची ग्रेव्ही पाहिजे तितकी घट्ट (How to Easily Thicken Gravy if Too Thin) आणि दाटसर होत नाही. यामुळे भाजीची ग्रेव्ही कधी पातळ होते आणि यामुळे ती फारशी टेस्टी देखील लागत नाही. अशावेळी घरी तयार केलेल्या भाज्यांची ग्रेव्ही जाड, दाटसर आणि घट्ट होण्यासाठी काय करायचं याच्या सोप्या टिप्स पाहूयात.
2 / 8
ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही मैद्याचा वपर करू शकता. यासाठी एका वाटीत २ चमचे मैदा आणि अर्धा कप पाणी घेऊन याचे मिश्रण तयार करा आणि ग्रेव्हीत मिसळा. जर तुम्ही मैदा अजिबातच खात नसाल तर मैद्याऐवजी मक्क्याचं पीठ, ज्वारीच्या पीठाचा वापर करू शकता.
3 / 8
बेसन पीठ सर्वांच्याच घरी उपलब्ध असते. बेसनाचा वापर करण्याआधी बेसन व्यवस्थित भाजून घ्या. याची पेस्ट बनवण्यासाठी एक चमचा बेसनात अर्धा कप पाणी मिसळून पेस्ट तयार करा. बेसनाच्या पीठामुळे भाजीला मस्त टेक्स्चर येईल.
4 / 8
भाज्यांमध्ये वापरण्यासाठी तुम्ही काजू, बदाम वाटून त्याची वेगवेगळी पेस्ट बनवून ठेवू शकता. यामुळे भाजीची पेस्ट घट्ट होणार नाही तर स्वादही वाढेल. याव्यतिरिक्त फ्लेक्स सिड्स आणि तीळाची पेस्टही तुम्ही घालू शकता.
5 / 8
जर तुम्ही एखादी पंजाबी स्टाईल भाजी बनवत असाल तर दही आणि सायीचा वापर करून तुम्ही भाजीची ग्रेव्ही घट्ट करू शकता.
6 / 8
एरवीही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये आपण शेंगदाण्याचा कुट घालतोच. आता त्यात थोडी कणिक पण घाला. कणिक आणि दाण्याचा कुट समान प्रमाणात घेऊन पाणी टाकून मिक्स करा. हे मिश्रण भाजीत घाला. भाजी घट्ट होण्याचा वेग नक्कीच वाढेल.
7 / 8
भाज्यांच्या ग्रेव्हीला अधिक दाटसरपणा येण्यासाठी आपण मिल्क पावडरचा देखील वापर करु शकता. यासाठी मिल्क पावडर थोड्याशा पाण्यांत विरघळवून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही तयार मिल्क पावडरची पेस्ट भाजीच्या ग्रेव्हीत घालावी यामुळे भाजीला दाटसरपणा येईल.
8 / 8
जर भाजी जास्त पातळ झाली असेल तर बटाटा स्टार्चच्या मदतीने ग्रेव्ही घट्ट करू शकता. त्यासाठी एक उकडलेला बटाटा घ्या आणि मॅश करून भाजीत घाला. ग्रेव्हीमध्ये बटाटा घातल्याने स्टार्च तयार होईल आणि भाजीचे टेक्सचर घट्ट होईल.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स