Join us   

पावसाळ्यात साखर - गुळाच्या डब्याला मुंग्या लागल्या ? करा सोपे ६ उपाय, मुंग्या होतील कायम दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 5:58 PM

1 / 7
कोणताही गोड पदार्थ म्हटला की त्याला मुंग्या येणं सहाजिक आहेच. या मुंग्या किचनमधील एखाद्या गोड पदार्थाला एकदा चिकटून बसल्या की मग काही विचारुच नका. एकदा का या मुंग्या किचनमध्ये शिरल्या की, सगळ्या पदार्थांचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही, त्यातही गोड पदार्थ म्हटलं की हमखास मुंग्या येतात. पावसाळा हा असा ऋतू आहे की या ऋतूत घरात डास, माशा, चिलटं, मुंग्या फार मोठ्या प्रमाणांत येतात. किचनमध्ये मुंग्यांनी शिरकाव केला की त्या खास करुन साखर, गुळाच्या डब्याजवळच असतात. या मुंग्या जर गूळ आणि साखरेच्या डब्याला चिकटल्या तर त्या निघता निघत नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं ते समजत नाही. यासाठीच पावसाळ्यात साखर आणि गुळाच्या डब्यांना मुंग्या लागू नयेत म्हणून काही सोपे उपाय लक्षात ठेवूयात(how to keep sugar safe from ants).
2 / 7
एका छोट्या कॉटनच्या रुमालात लवंग बांधून त्याची पोटली तयार करा, ही पोटली साखरेच्या डब्यात ठेवा. यामुळे मुंग्या साखरेच्या डब्याला लागणार नाही. याउलट आपण लवंगाची पावडर करून डब्याच्या भोवतीने शिंपडू शकतो. यामुळे डब्याजवळ मुंग्या फिरकणार नाही. ही पावडर दर ३ ते ४ दिवसांनी साफ करा, व नवीन पावडर शिंपडा.
3 / 7
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी आपण ओल्या हळदीचा वापर करू शकता. ओल्या हळदीचे तुकडे साखरेच्या कंटेनरमध्ये ठेवा. साखरेच्या भांड्यात ओल्या हळदीचे तुकडे ठेवल्याने, मुंग्या डब्याजवळ येत नाही. हळदीचा सुगंध बराच काळ साखरेच्या डब्यात राहतो, हळदीच्या गरम प्रभावामुळे मुंग्या डब्याजवळ येत नाही.
4 / 7
साखर - गुळाच्या डब्याजवळ मुंग्या येत असतील तर, साखरेच्या डब्यात दोन ते तीन अख्खी वेलची ठेवा. यामुळे डब्याजवळ मुंग्या येणार नाही.
5 / 7
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरेल. मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी ज्या प्रकारे आपण साखरेच्या भांड्यात मोठी वेलची ठेवतो, त्याचप्रमाणे दालचिनी साखरेच्या डब्यात ठेवा. याच्या उग्र वासामुळे मुंग्या डब्याजवळ येणार नाहीत.
6 / 7
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी आपण तमालपत्राचाही वापर करू शकता. लवंग, हळद आणि दालचिनी प्रमाणेच तमालपत्रातही नैसर्गिकरीत्या सुगंध असतो, जो मुंग्यांना साखरेजवळ जाण्यापासून रोखतो. यासाठी ३ ते ४ तमालपत्र साखरेच्या डब्यात ठेवा.
7 / 7
सर्वप्रथम, लिंबाची साल उन्हामध्ये सुकवून घ्या. ज्यामुळे त्यातून लिंबाचा रस निघणार नाही. आता ही साल साखरेच्या डब्यात ठेवा. लिंबाच्या सालीच्या उग्र गंधामुळे मुंग्या डब्याजवळ येणार नाही.
टॅग्स : अन्नकिचन टिप्स