Join us   

स्वयंपाकासाठी तुम्ही भेसळीचे मसाले तर वापरत नाही ना? बघा मसाल्यांची शुद्धता कशी ओळखायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 4:56 PM

1 / 7
हल्ली अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ खूप जास्त वाढली आहे. त्यामुळे आपण एवढे पैसे देऊन विकत घेत आहोत ते पदार्थ शुद्ध आहेत की भेसळीचे हे सांगणं कठीण झालं आहे.
2 / 7
अगदी आपल्या रोजच्या स्वयंपाकात असणारे तिखट, हळद, हिंग हे पदार्थही भेसळीचे असू शकतात. त्या पदार्थांमधली भेसळ कशी ओळखायची याविषयीच्या काही टिप्स thebetterindia या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.
3 / 7
लाल तिखटामधली भेसळ ओळखायची असेल तर एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये लाल तिखट टाका. जर लाल तिखट थोडावेळ पाण्यावर तरंगलं आणि हळूहळू ग्लासच्या तळाशी गेलं, पाण्याला हलकासा लाल रंग आला तर ते शुद्ध आहे. भेसळीचं तिखट पाण्यात टाकल्याबरोबर तळाशी जातं आणि पाण्याला गडद लाल रंग येतो.
4 / 7
हिंग एका चमच्यात घ्या आणि गॅसच्या फ्लेमजवळ न्या. जर त्याने लगेच आग पकडली तर ते शुद्ध आहे. भेसळीचं हिंग आग पकडणार नाही.
5 / 7
जिरे हातावर घेऊन रगडा. त्यानंतर ते हातातून टाका. जर हातावर काळ्या पावडरीसारखा पदार्थ राहीला तर ते जिरे भेसळीचे आहेत
6 / 7
पपईच्या बिया वापरून मिऱ्यांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळे त्यांच्यातली भेसळ ओळखण्यासाठी चमचाभर मिरे ग्लासभर पाण्यात टाका. शुद्ध मिरे लगेच तळाशी जातात तर नकली मिरे पाण्यावर तरंगतात.
7 / 7
शुद्ध हळद पाण्यात टाकली असता त्या पाण्याला हलकासा पिवळा रंग येईल. पण भेसळीची हळद पाण्यात टाकल्यास पाणी गडद पिवळ्या रंगाचे होईल.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोम रेमेडी