1 / 11भाजी विकत घेताना ती चांगली आहे का नाही हे कसं कळणार ? वापरायच्या आधीच भाजी कशी आहे हे ओळखता येते का?2 / 11भाजी किंवा फळे चांगल्या दर्जाची आहेत की नाही हे तपासण्यासाठी काही पद्धती असतात. ज्या आपल्याला आई- आजीनी सांगितल्या आहेत. 3 / 11काही भाज्यांचा दर्जा ओळखण्याच्या पद्धती पाहूया. अगदी सोप्या आहेत. लक्षातही राहतील.4 / 11काही भाज्यांचा दर्जा ओळखण्याच्या पद्धती पाहूया. अगदी सोप्या आहेत. लक्षातही राहतील.5 / 11कांदा विकत घेताना काद्याचं तोंड बघायचं. ते थोडं जरी उघडलं असेल याचा अर्थ, कांदा काही फार चांगला नाही. ताज्या कांद्याचे तोंड बंद असते.6 / 11आलं विकत घेताना आपण गुळगुळीत स्वच्छ विकत घेतो. असं चमकदार आलं खरं तर रसायनांच्या मदतीने साफ केलेलं असत. त्यामुळे आलं घेताना जरा जुनं दिसणारं किंवा माती असलेलंच विकत घ्या.7 / 11टोमॅटो विकत घेताना मऊ झालेले विकत घेऊ नका. त्यांच्या आत कीड असू शकते. लालसर व जड टोमॅटोच विकत घ्या. 8 / 11अननस विकत घेताना ते लांबट आकाराचे घ्यावे. लांबट चवीला जास्त गोड असते. तसेच अननसाच्या खालच्या बाजूला छान वास येत असेल तरच ते ताजे आहे. खालून ते मऊ आहे का ते बघा. ते मऊ असेल तरच ते चांगले आहे.9 / 11काकडी बरेचदा कडू निघते. कडू काकडी एका बाजूने वाकडी होत जाते. सुरकूतलेली काकडी कधीच विकत घेऊ नका. टोकाला वाकलेली काकडी अजिबात घेऊ नका. 10 / 11लिंबू वापरायच्या आधी दाबून बघायचा तो थोडा मऊ लागला याचा अर्थ तो पूर्णपणे तयार आहे.11 / 11दुधी विकत घेताना सहजच चांगली आहे का नाही ते ओळखता येते. दुधीला नखाने दाबून बघायचे. नख सहज त्यावर उठले आणि ती जरा रसाळ लागली तर ती विकत घ्या.