फळं- भाज्या जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी ५ टिप्स, बघा प्रत्येक फळ- भाजी साठवून ठेवण्याची खास पद्धत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 1:18 PM 1 / 8१. बाजारात वारंवार जाणं होत नाही. किंवा मग रोजच्या रोज भाज्या, फळं घेणं होत नाही. अशावेळी आपण साधारण आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्या आणि फळं एकदाच घेऊन ठेवताे.2 / 8२. पण बऱ्याचदा त्या भाज्या किंवा फळं साठवून ठेवण्यात आपल्याकडून काहीतरी चूक होते आणि त्यामुळे मग फ्रिजमध्ये ठेवूनही फळं- भाज्या सडून जातात. 3 / 8३. म्हणूनच फळं आणि भाज्या जास्त दिवस ताज्या राहण्यासाठी त्या फ्रिजमध्ये कशा पद्धतीने साठवून ठेवाव्या, याविषयी या काही खास टिप्स. या टिप्स kalejunkie या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.4 / 8४. स्ट्रॉबेरी साठवून ठेवायची असेल तर सगळ्यात आधी सगळ्या स्ट्रॉबेरी एका भांड्यात काढून घ्या. १ कप व्हिनेगर आणि ३ कप थंड पाणी एकत्र करून त्यात स्ट्रॉबेरी १० मिनिटांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर त्यातून काढून कपड्याने पुर्णपणे कोरड्या करून घ्या. त्या व्यवस्थित कोरड्या झाल्या की एका डब्यात टिश्यू पेपर टाका. त्यात स्ट्रॉबेरी ठेवा आणि त्यावरून पुन्हा एक टिश्यू पेपर टाका. हा डबा फ्रिजमध्ये ठेवल्यास १ आठवडा तरी स्ट्रॉबेरी फ्रेश राहतील. 5 / 8५. सोलून ठेवलेल्या लसूण पाकळ्या जास्त दिवस फ्रेश ठेवायच्या असतील तर त्या एका डब्यात टाका. त्यात पाकळ्या बुडतील एवढं थंड पाणी टाका. डब्याचं झाकण लावून तो फ्रिजमध्ये ठेवून द्या. २ आठवड्याच्या आत या पाकळ्या वापरून टाकाव्या.6 / 8६. सफरचंद चिरल्यानंतर त्याच्या फोडी लाल पडू नयेत यासाठी त्या फोडी एका भांड्यात ठेवा. त्यात फोडी बुडतील एवढं थंड पाणी टाका. १ ते २ टी स्पून मीठ टाका. ५ मिनिटांसाठी फोडी तशाच पाण्यात राहू द्या. त्यानंतर त्या पाण्यातून काढा आणि एका डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. फोडी लाल- काळ्या पडणार नाहीत. 7 / 8७. कोथिंंबीर किंवा कोणतीही पालेभाजी फ्रेश ठेवण्यासाठी काचेची अर्धी बरणी भरून पाणी घ्या. त्यात देठं बुडतील अशा पद्धतीने पालेभाजी किंवा कोथिंबीर बुडवून ठेवा. ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या. जशी पाहिजे तशी भाजी किंवा कोथिंबीर घेऊन वापरा. 8 / 8 ८. काकडी साठवून ठेवण्यासाठी ती एका डब्यात घाला. त्यात काकडी बुडेल एवढे पाणी आणि अगदी चिमुटभर बेकिंग सोडा टाका. डब्याचे झाकण लावून तो फ्रिजमध्ये ठेवून द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications