डब्यांत चपात्या ठेवल्या की सादळतात-ओल्या होतात? ५ टिप्स, पोळ्या राहतील ताज्या-मऊमऊ
Updated:April 11, 2025 17:23 IST2025-04-11T17:17:21+5:302025-04-11T17:23:23+5:30
How to keep roti soft in tiffin: Roti stays fresh in lunch box: How to pack roti without getting soggy: Tips for soft rotis in tiffin: Keep chapati soft and fresh: चपाती बनवल्यानंतर ती टोपलीत किंवा डब्यात ठेवली की, तिला पाणी सुटते. ज्यामुळे ती चिकट-ओलसर होते

आपल्या प्रत्येकाच्या घरात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती खाल्ली जाते. चपाती ही भारतीय जेवणात अधिक महत्त्वाचा पदार्थ. ज्याशिवाय आपली कोणाचीही भूक भागत नाही. (How to keep roti soft in tiffin)
अनेकदा चपाती बनवल्यानंतर ती टोपलीत किंवा डब्यात ठेवली की, तिला पाणी सुटते. ज्यामुळे ती चिकट-ओलसर होते आणि काही तास देखील नीट राहात नाही. त्यामुळे चपाती फेकून देण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो. (Roti stays fresh in lunch box)
जर आपल्यासोबत देखील असेच काहीसे होत असेल तर आपण या सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्या. ज्यामुळे चपात्या ओल्या होणार नाही. दिवसभर ताज्या राहातील.
चपाती बनवल्यानंतर टोपलीत ठेवण्यापूर्वी तळाशी दोन काट्याचे चमचे ठेवा. त्यावर चपात्या ठेवा. ज्यामुळे त्या ओल्या होणार नाही.
चपाती ओली होऊ नये यासाठी गरमागरम चपात्या सरळ डब्यात ठेवू नका. त्याची वाफ निघाल्यानंतर झाकून ठेवा.
चपाती ठेवताना टोपली किंवा डब्यात पेपर किंवा रुमाल ठेवा. पेपर नॅपकिन वाफ शोषून घेतो. यामुळे चपात्या ओल्या होत नाहीत.
चपातीसाठी पेपर किंवा टिश्यू वापरायचा नसेल तर आपण कापसाच्या किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवू शकतो.