Join us

डब्यांत चपात्या ठेवल्या की सादळतात-ओल्या होतात? ५ टिप्स, पोळ्या राहतील ताज्या-मऊमऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 17:23 IST

1 / 7
आपल्या प्रत्येकाच्या घरात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती खाल्ली जाते. चपाती ही भारतीय जेवणात अधिक महत्त्वाचा पदार्थ. ज्याशिवाय आपली कोणाचीही भूक भागत नाही. (How to keep roti soft in tiffin)
2 / 7
अनेकदा चपाती बनवल्यानंतर ती टोपलीत किंवा डब्यात ठेवली की, तिला पाणी सुटते. ज्यामुळे ती चिकट-ओलसर होते आणि काही तास देखील नीट राहात नाही. त्यामुळे चपाती फेकून देण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो. (Roti stays fresh in lunch box)
3 / 7
जर आपल्यासोबत देखील असेच काहीसे होत असेल तर आपण या सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्या. ज्यामुळे चपात्या ओल्या होणार नाही. दिवसभर ताज्या राहातील.
4 / 7
चपाती बनवल्यानंतर टोपलीत ठेवण्यापूर्वी तळाशी दोन काट्याचे चमचे ठेवा. त्यावर चपात्या ठेवा. ज्यामुळे त्या ओल्या होणार नाही.
5 / 7
चपाती ओली होऊ नये यासाठी गरमागरम चपात्या सरळ डब्यात ठेवू नका. त्याची वाफ निघाल्यानंतर झाकून ठेवा.
6 / 7
चपाती ठेवताना टोपली किंवा डब्यात पेपर किंवा रुमाल ठेवा. पेपर नॅपकिन वाफ शोषून घेतो. यामुळे चपात्या ओल्या होत नाहीत.
7 / 7
चपातीसाठी पेपर किंवा टिश्यू वापरायचा नसेल तर आपण कापसाच्या किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवू शकतो.
टॅग्स : अन्न