Join us   

मऊ, लुसलुशीत भाकरी बनवा 'या' ५ टिप्सनी; परफेक्ट भाकरीसाठी उपयुक्त पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 3:29 PM

1 / 16
हिवाळ्यात अनेक घरांमध्ये चपातीपेक्षा जास्त भाकरी खाल्ली जाते. ज्वारी, बाजरीची, तांदळाची भाकरी व्हेज असो किंवा नॉनव्हेज कोणत्याही जेवणाबरोबर मस्त लागते. पण परफेक्ट भाकरी बनवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. (How to make Bhakri) भाकरी बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुमचं काम सोपं होऊ शकतं.
2 / 16
भाकरीचं पीठ दळण्यापासून ते शेकण्यापर्यंत खूप कामं करावी लागतात अशाच तर भाकरी व्यवस्थित बनली नाही तर जेवणाची मजा येत नाही. म्हणूनच भाकरी करण्याच्या ट्रिक्स माहित करून घेऊया
3 / 16
ज्वारीचं पीठ थोडं मध्यम जाडसर दळून घ्यावं. हे पीठ चांगले मळले गेले की भाकरी सहज थापली किंवा लाटली जाते.
4 / 16
तुम्हाला भाकरीची उकड काढायची नसेल मळताना थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा.
5 / 16
भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्या. पाणी जास्त पडणार नाही याची काळजी घ्या. पाणी जास्त घातलं तर भाकरी थापताना तुटू शकते.
6 / 16
भाकरीचं पीठ मळताना तुम्ही गरजेप्रमाणे पाणी घालू शकता.
7 / 16
मळलेल्या पीठाचे मध्यम आकाराच गोळा तयार करा.
8 / 16
हा गोळा हातावर थापून गोलाकार चकती तयार करा.
9 / 16
भाकरी थापण्यासाठी तुम्ही पोळपाट किंवा परातीचा वापर करू शकतात लाटून करायची असेल तर पोळपाट वापरा.
10 / 16
गोल आकार हातानं बनवल्यानंतर खाली पीठ टाकून भाकरी थापायला सुरूवात करा.
11 / 16
भाकरी थापताना पीठ कमी पडल्याने किंवा जास्त जोर दिला गेल्याने भाकरी तुटते किंवा खाली चिकटते. म्हणून लक्षपूर्वक भाकरी थापा.
12 / 16
भाकरी तव्यावर टाकताना खालचा पीठाचा भाग वर असायला हवा.
13 / 16
भाकरी दोन्ही हातांनी खालच्या बाजूनं उजून तव्यावर ठेवा किंवा तुम्ही उलथणीचा वापर करू शकता.
14 / 16
भाकरीच्या पीठाच्या भागावर पाण्याचा हात फिरवा. वरच्या बाजूनं पाणी सुकलं भाकरी कोरडी दिसायला लागली की भाकरी खालच्या बाजूनं थापून घ्या.
15 / 16
भाकरी शिजल्यानंतर काळे डाग पडले किंवा पुन्हा दुसऱ्या बाजूनं शेकून घ्या.
16 / 16
भाकरी व्यवस्थित शेकल्यानंतर तव्यावरून काढून गॅसवर पुन्हा एकदा शिजवून घ्या.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स