Join us   

थंडीतही विकतसारखं घट्ट दही घरीच करा; 5 टिप्स, कापता येईल इतकं परफेक्ट-मलईदार होईल दही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:56 AM

1 / 7
दही लावण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस सगळ्यात उत्तम मानले जातात. (Curd Making Tips) कारण दही तयार होण्यासाठी गरम जागेची गरज असते. अनेकांची तक्रार असते की हिवाळ्याच्या दिवसांत व्यवस्थित दही लागत नाही. दही बनवण्याच्या काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं काम सोपं होऊ शकतं. विकतासारखं घट्ट दही करण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ते पाहूया.(Yogurt making at home)
2 / 7
१) हिवाळ्यात दही लावण्यासाठी साधं दूध वापरण्याऐवजी फुल क्रिम दूधाचा वापर करा. हे दूध दही लावण्यासाठी उत्तम मानले जाते. दूध हलकं गरम करून घ्या. दूध जास्त गरम असू नये अन्यथा दही व्यवस्थित लागणार नाही. (Useful Tips to Help Set Curd in Winters)
3 / 7
२) दही गरम जागेवर ठेवा. एका दिवसासाठी दही गरम जागेवर ठेवा किंवा गरम कपड्यात गुंडाळून घ्या. यामुळे दह्याला तयार होण्यासाठी योग्य तापमान मिळेल आणि दही परफेक्ट लागेल.
4 / 7
३) दही लावण्यासाठी मेथीच्या दाण्याचा वापर करू शकता. मेथीचे दाणे दह्याच्या विरजणात मिसळा, मेथी गरम असते यामुळे दही उत्तम प्रकारे लागेल.
5 / 7
४) दही लावताना त्यात एक हिरवी मिरची घाला. हिरव्या मिरचीत असे काही बॅक्टेरियाज अससतात ज्यामुळे दूधातील प्रोटीन्स दही तयार होण्यास सहाय्यक ठरतात.
6 / 7
५) दूध गरम करून त्यात दही मिसळ्यानंतर अशा भांड्यात ठेवा ज्यात तुम्ही पीठ ठेवता. या मुळे दह्याला बाहेरून उष्णता मिळेल आणि दही पटकन तयार होईल.
7 / 7
कमी वेळात दही लावण्यासाठी तुम्ही दूध, मेथी व्यतिरिक्त इतरही पदार्थ वापरू शकता. जसं की तुमच्याकडे एल्यूमिनियम फॉईल, स्टिलची वाटी असेल तर याचा वापर करा.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न