Join us

ढोकळा कायम फसतो, फुगतच नाही? ८ टिप्स- विकतपेक्षा हलका ढोकळा करा घरच्याघरीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 19:19 IST

1 / 9
ढोकळा जितका फुलून मऊ, जाळीदार होतो तितकाच (Tips To Make Perfect Spongy No Fail Dhokla) तो दिसायला आणि खायला अतिशय सुंदर लागतो. जेव्हा आपण घरी ढोकळा (How To Make Soft & Spongy Dhokla At Home) बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार होत नाही. ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. अशावेळी ढोकळा बनवताना तो चांगला फुलून यावा यासाठी लक्षात ठेवा काही टिप्स.
2 / 9
बेसनाचा ढोकळा तयार करत असताना, सर्वात आधी बेसन वापरण्यापूर्वी बारीक चाळणीने नीट चाळून घ्यावे. त्यामुळे बेसन पिठास एक प्रकारचा गुळगुळीतपणा येऊन पिठास फुगवटा येण्यास मदत होते.
3 / 9
ढोकळ्याचे पीठ तयार करताना त्यात आंबट दही घालू शकता. यामुळे किण्वन (फिट फुलून येण्यास) प्रक्रियेला गती मिळते आणि ढोकळा मऊ आणि स्पॉंजी तयार होतो.
4 / 9
ढोकळ्याचे बॅटर तयार करताना त्यात अर्धा चमचा इनो किंवा फ्रुट सॉल्ट घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे. यामुळे पीठ लगेच फुलते म्हणून ढोकळा मऊ आणि स्पॉंजी होतो.
5 / 9
ढोकळ्याचे बॅटर तयार करत असताना त्यात १ ते २ तेल घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे. त्यामुळे ढोकळ्याच्या पिठात ओलावा टिकून राहण्यास मदत होते, परिणामी ढोकळा विकतसारखा मऊ आणि सॉफ्ट होतो.
6 / 9
ढोकळा व्यवस्थित वाफवणे सर्वात महत्वाचे आहे. ढोकळा वाफवण्याचे स्टीमर ढोकळा त्यात ठेवण्यापूर्वी प्री - हिट करून घ्यावे. ढोकळा बॅटर ज्या भांड्यात ओतले आहे त्या भांड्याला आधी तेलाचा हात फिरवून ग्रीस करून घ्यावे. मगच त्यात ढोकळा बॅटर ओतून १२ ते १५ मिनिटे ढोकळा वाफवून घ्यावा.
7 / 9
ढोकळा नीट वाफवून झाल्यावर एक कप पाण्यात प्रत्येकी एक टेबलस्पून साखर आणि लिंबाचा रस घालावा. हे सगळे मिश्रण चमच्याने पाण्यात मिसळून ते पाणी गरम ढोकळ्यावर ओतावे. यामुळे ढोकळा दीर्घकाळ मऊ आणि स्पॉंजी राहण्यास मदत होते.
8 / 9
ढोकळ्याच्या तयार बॅटरमध्ये, एक टेबलस्पून सोडा घालावा. सोडा घातल्यावर त्यावर २ टेबलस्पून पाणी घालून तो सोडा अ‍ॅक्टिव्ह करून घ्यावा. आता हा सोडा त्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावा. ढवळून झाल्यानंतर सोडा अ‍ॅक्टिव्ह असतानाच पटकन ते बॅटर गरम पाण्याने भरलेल्या स्टिमरमध्ये शिजण्यासाठी ठेवून द्यावे.
9 / 9
ढोकळा मऊ होण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणे फार महत्वाचे असते. मिश्रण एकाच दिशेने हळूहळू ढवळत असताना पाणी घाला. तुम्ही मिश्रण हातानेही फेटू शकता.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स