कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:14 PM 1 / 7भारतात तूप एक स्टेपल फूड आहे. प्रत्येक राज्यात तुपाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तूप शुद्ध आहे की नाही याबाबत कल्पना येत नाही कारण बाजारात अनेक ठिकाणी भेसळयुक्त तूप विकलं जातं. आजकाल खाण्यापिण्याच्या बऱ्याच पदार्थांमध्ये भेसळ दिसून येत आहे. 2 / 7लोक घरी तूप बनवण्याचा विचार करतात पण घरी तूप बनवणं खूपच कठीण वाटतं आणि घरी तूप बनवण्यात बराचवेळ निघून जातो. तूप बनवण्याचे सोपे उपाय वापरून तुम्ही घरच्याघरी झटपट तूप बनवू शकता.3 / 7आपल्या घरांमध्ये तूप बनवण्यासाठी मलई साठवली जाते. जेव्हा मलई घट्ट होते की तूप बाहेर पडू शकते, तेव्हा ते कढईमध्ये शिजवले जाते. शिजवताना ते वारंवार ढवळले जाते. तूप वेगळे झाल्यावर ते गाळून घेतले जाते.4 / 7यासाठी सर्वप्रथम कुकरच्या बेसमध्ये थोडे पाणी टाकून त्यावर सायीचे भांडे ठेवून त्यानंतर ढवळत राहा. तुम्हाला ते भांडे काहीवेळ उच्च आचेवर ठेवावे लागेल आणि झाकण बंद करा. 5 / 7आता एका शिट्टीनंतर कुकरचे झाकण उघडा. तूप आपोआपच वाढू लागलेले दिसेल. आता त्यात बेकिंग सोडा टाका. झाकण न ठेवता थोडे थोडे शिजवा. कुकरमधून तूप बाहेर येईपर्यंत ढवळावे लागेल. तूप तयार झाले की ते बाहेर काढून गाळून घ्या.6 / 7जर तुम्ही घरी तूप बनवत असाल तर खूप दिवस साठवलेली साय फ्रिजमधली तर बाहेर काढून ठेवा. अशा स्थितीत, प्रथम रूम टेम्परेचरवर येऊ द्या.7 / 7जर तुम्ही लोण्यातून तूप काढण्याचा प्रयत्न करत असाल तर ही युक्ती काम करणार नाही. प्रेशर कुकरमध्ये लोण्यापासून तूप न बनवल्यास उत्तम. आणखी वाचा Subscribe to Notifications