Join us   

केमिकल्स असणारी विकतची आलं- लसूण पेस्ट घेण्यापेक्षा घरीच तयार करा, महिनाभर टिकेल- बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2024 9:02 AM

1 / 6
कोणत्याही मसालेदार पदार्थाची चव आणखी खुलविण्यासाठी लागणारे दोन मुख्य पदार्थ म्हणजे आलं आणि लसूण
2 / 6
आलं- लसूण पेस्ट मसालेदार भाज्यांमध्ये पाहिजेच. अशावेळी आपलं काम सोपं आणि झटपट व्हावं म्हणून आपण विकत मिळणाऱ्या आलं- लसूण पेस्ट भाज्यांमध्ये वापरतो.
3 / 6
पण त्यामुळे पदार्थाला छान खमंग झणझणीतपणा येत नाही. शिवाय विकत मिळणाऱ्या आलं- लसूण पेस्टमध्ये खूप केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटीव्हही घातलेले असतात. त्यामुळे त्या खाण्यापेक्षा घरच्याघरी अगदी महिनाभर चांगली टिकणारी आलं लसूण पेस्ट कशी करायची पाहा..
4 / 6
यासाठी आलं आणि लसूण याचं प्रमाण १: २ या प्रमाणात घ्या. हे पदार्थ थोडासा लिंबाचा रस आणि तेल घालून मिक्सरमधून फिरवून अगदी बारीक करून घ्या.
5 / 6
त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठदेखील टाकून ठेवा. मीठ, लिंबू आणि तेल या नॅचरल प्रिझर्व्हेटीव्हमुळे या पेस्ट जास्त दिवस टिकतात.
6 / 6
एखाद्या एअरटाईट डब्यात भरून त्या फ्रिजमध्ये ठेवल्यास महिनाभर तरी त्या पेस्ट उत्तम राहतात. त्यांचा सुगंध आणि चव दोन्हीही अजिबात खराब होत नाही.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती