परफेक्ट जाळीदार डोसा हवा? डाळ-तांदूळ भिजवताना लक्षात ठेवा ५ टिप्स- डोसा कधीच बिघडणार नाही
Updated:May 14, 2024 12:30 IST2024-05-14T11:37:53+5:302024-05-14T12:30:32+5:30

परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल डोसे करायचे असतील तर त्यासाठी बॅटर तयार करताना किंवा डाळ- तांदूळ भिजत घालताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा डोसे करण्याचा बेत कधीच फसणार नाही.
डोसे तयार करण्यासाठी दक्षिण भारतीय लोक तांदूळ आणि उडीद डाळ यांचं जे प्रमाण घेतात ते ३: १ याप्रमाणे असतं. म्हणजेच ३ वाट्या जर तांदूळ घेतले तर त्याच्या जोडीला १ वाटी उडीद डाळ घ्यावी.
डाळ आणि तांदूळ जेव्हा मिक्सरमधून बारीक कराल तेव्हा त्यासाठी फ्रिजमधलं अगदी थंडगार पाणी वापरा. डोसे छान होतील.
डाळ- तांदूळ मिक्सरमधून वाटल्यानंतर लगेच त्यात मीठ घालू नका. जेव्हा डोसे कराल तेव्हा ऐनवेळी त्यामध्ये मीठ घाला.
जर तुम्हाला मऊ, जाडसर डोसा आवडत असेल तर अडीच वाटी तांदूळ आणि दिड वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्या.
जर तुम्हाला कुरकुरीत, पातळ डोसा आवडत असेल तर सव्वातीन वाट्या तांदूळ आणि पाऊण वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्या...
अशा पद्धतीने बॅटर तयार केलं तर तुमचे डोसे अगदी परफेक्ट जाळीदार होतील..