1 / 11गुढी पाडवा म्हटलं की प्रत्येक (How To Make Perfect Fluffy Puri) घरोघरी हमखास श्रीखंड - पुरीचा (How to make Puffy & Soft Puri) बेत केला जातो. पुरी म्हटलं की ती टम्म फुगलेली, मऊ, कमी तेलकट असावी असच वाटत. परंतु काहीवेळा आपण मेहेनत घेऊनही पुऱ्या हव्या तशा तयार होत नाही. कधी वातड, तर कधी खूपच तेलकट होतात. यासाठी पुऱ्या परफेक्ट टम्म फुगाव्यात यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात. 2 / 11आपण पुऱ्या साधारणपणे पोळपाटावर लाटतो. तर या पोळपाटाला आणि लाटण्याला सगळीकडून चांगले तेल लावून घ्या. साधारण ३ ते ४ पुऱ्या झाल्यावर पुन्हा पुन्हा अशाप्रकारे दोन्हीला तेल लावा. त्यामुळे पुऱ्या चांगल्या लाटल्या जातील. 3 / 11पुऱ्या झटपट व्हाव्यात आणि खाल्ल्यासारख्या वाटाव्यात यासाठी आपण त्या थोडया मोठ्या आकाराच्या करायला जातो. पण त्यामुळे पुऱ्या फुगण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. पुऱ्या लहान आकाराच्या आणि एकसारख्या लाटायला हव्यात. 4 / 11पुरी लाटून झाल्यावर तेलात सोडण्याआधी तेल कितपत तापले आहे याचा अंदाज घ्यायला हवा. पहिली पुरी ही ट्रायल असते त्यामुळे तेल चांगले तापलेले असेल तर ही पुरी पटकन फुगते. मग गॅस बारीक करावा आणि मग बाकीच्या पुऱ्या तळाव्यात. थोडा वेळाने कढईतून धूर यायला लागतो आणि पुऱ्या ब्राऊन व्हायला लागतात, अशावेळी गॅश बंद करावा.5 / 11पुरी छान फुगण्यासाठी तेलात घातल्यावर ती हळूवारपणे झाऱ्याने दाबत राहावी. तसेच त्याच्या वरच्या बाजूवर एकसारखे तेल उडवत राहावे. त्यामुळे पुरी फुगण्यास मदत होते. 6 / 11पुऱ्या तळायच्या आधी ५ ते ६ लाटून ठेवा. दुसरीकडे तेल चांगले तापू द्या. तसेच पुरी खूप पातळ आणि खूप जाड नको, मध्यम जाडीची हवी. तुम्हाला छान गोल आकार हवा असेल आणि तसा जमत नसेल तर सरळ वाटीने किंवा एखाद्या झाकणाने पुरी गोलाकार करुन घ्यावी. 7 / 11पुऱ्या करताना कणिक व्यवस्थित भिजवणे गरजेचं आहे. यासाठी कणिक मळताना त्यात दही आणि चमचाभर तेल घाला. आपण कोमट पाण्याचा वापर करूनही कणिक मळू शकता. कणिक मळताना घट्ट मळून घ्या. १० मिनिटांसाठी कणिक झाकून ठेवा. नंतर कणकेच्या पुऱ्या लाटून घ्या. अशा पद्धतीने पुऱ्या केल्यास त्या चांगल्या फुलतात. 8 / 11पुऱ्या अनेकदा मऊ होतात, तळल्यानंतर कुरकुरीत होत नाहीत. यासाठी आपण कणिक मळताना त्यात थोडं तांदुळाचं पीठ घालू शकता. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील. 9 / 11कणिक मळताना फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करू नका. त्यात साखर आणि थोडा रवाही मिक्स करा. यामुळे पुऱ्या छान कुरकुरीतही होतील. रवा घातल्याने पुऱ्या कुरकुरीत होतात. साखरेमुळे पुरीची चव दुप्पटीने वाढते.10 / 11पुऱ्या कडक किंवा जास्त प्रमाणात तेल शोषून घेत असतील तर, पुरी तळताना तेलामध्ये थोडे मीठ घाला. मीठ घातल्यानंतर पुऱ्या जास्त तेल शोषून घेणार नाहीत. शिवाय कडकही होणार नाही.11 / 11पुऱ्यांसाठीचे कणिक मळताना त्यात चमचाभर कोमट तेल घाला. यामुळे कणिक छान मळून तयार होईल.