Join us

घरी पनीर करताना लक्षात ठेवा ८ टिप्स, पनीर होईल विकतसारखं मऊमुलायम परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 15:47 IST

1 / 10
पनीर सहज बाहेर विकत मिळतं. पण विकतचं पनीर महाग (8 tips to make soft paneer at home) तर असतंच शिवाय त्यात भेसळ असण्याचीही शक्यता असते. यासाठी आपण अनेकदा घरच्याघरीच पनीर तयार करतो. परंतु घरी तयार केलेल्या पनीर बाबत अनेकांची तक्रार असते. घरी केलेलं पनीर कडक किंवा वातड होतं. असे असले तरीही पनीर तयार करण्याची योग्य पद्धत फॉलो केल्यास घरी तयार केलेलं पनीर देखील विकतच्या सारखं मऊ मुलायम होतं.
2 / 10
यासाठीच घरच्याघरी पनीर तयार करताना काही (How to make soft paneer at home) आवश्यक त्या टिप्स लक्षात ठेवल्या की पनीर बिघडत नाही. जर तुम्ही देखील घरच्याघरीच पनीर तयार करत असाल तर नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात.
3 / 10
विकतसारखे मऊमुलायम पनीर बनवण्यात दूध सर्वात महत्वाची भूमिका बजावते. यासाठीच फुल-क्रीम दूध किंवा देशी गाई - म्हशीचे ताजे दूध वापरावे. टोन्ड किंवा कमी चरबीयुक्त दुधापासून बनवलेले पनीर कोरडे आणि कडक होऊ शकते. जर तुम्ही पॅकेज्ड दूध वापरत असाल तर ते उकळण्यापूर्वी त्यात फुल क्रीम नीट मिसळा.
4 / 10
दूध मोठ्या आचेवर उकळल्याने ते लवकर जळू शकते किंवा त्याचा पोत खराब होऊ शकतो. दूध मध्यम ते मंद आचेवर हळूहळू उकळवा जेणेकरून त्याचा क्रिमी पोत टिकून राहील आणि पनीर मऊ होईल.
5 / 10
दूध फाटण्यासाठी आपण लिंबाचा रस, पांढरे व्हिनेगर तसेच दह्याचा वापर करु शकतो. दह्याचा वापर करून फाटलेल्या दुधाचे पनीर मऊमुलायम बनते, तर लिंबाचा रस, पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करुन तयार केलेले पनीर थोडे कडक किंवा वातड होऊ शकते. जर तुम्हाला खूप मऊ पनीर हवे असेल तर दूध फाटण्यासाठी दह्याचा वापर करावा.
6 / 10
दूध उकळू लागले की, लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा दही थोडे थोडे घालून हलक्या हाताने मिसळा. जर एकाच वेळी खूप जास्त प्रमाणांत हे पदार्थ घातले तर पनीर कडक किंवा वातड होऊ शकते. यासाठी दूध फाटण्यासाठीचे पदार्थ एकदम एकाचवेळी दुधात न घालता हळूहळू दुधात मिसळून घ्यावे.
7 / 10
पनीर तयार झाल्यानंतर ते सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यावे. पनीर धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. पनीर धुतल्यामुळे यातील लिंबाच्या रसाचा किंवा व्हिनेगरचा आंबटपणा कमी होण्यास मदत होते तसेच यामुळे पनीर मऊमुलायम होते.
8 / 10
जर पनीरवर जास्त वजन ठेवले तर ते कठीण किंवा कडक होऊ शकते. पनीर गाळल्यानंतर, त्याला योग्य आकार आणि मऊपणा येण्यासाठी त्यावर हलके वजन ठेवून ३० ते ४० मिनिटे हलकेच दाब द्यावा.
9 / 10
दूध घट्ट झाल्यावर ते जास्त ढवळू नका. जास्त ढवळल्याने पनीर कडक आणि वातड होऊ शकते. यासाठी ते हलक्या हाताने मिसळून घ्या आणि नंतर गाळून घ्या.
10 / 10
जर तुम्ही लगेच पनीर वापरणार नसाल तर ते पाण्यात भिजवून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो आणि बराच काळ मऊ राहण्यास देखील मदत होते.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.