परफेक्ट कुरकुरीत-खमंग बटाटा वडा करण्याासाठी लक्षात ठेवा ७ गोष्टी, गाड्यावरच्या वड्यापेक्षा भारी चव... Published:October 17, 2024 06:59 PM 2024-10-17T18:59:22+5:30 2024-10-17T19:10:43+5:30
How to Make Mumbai Street Style Batata Vada At Home : Batata Vada - Street Style Snack with Tips & Tricks : How to make the Perfect Batata Vada : घरच्याघरी सोप्या पद्धतीनं परफेक्ट बटाटा वडा करण्याच्या खास टिप्स... मुंबईतील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं (How to Make Mumbai Street Style Batata Vada At Home) नातं अगदी वेगळंच आहे.'वडापाव' हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर, भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा, खमंग, झणझणीत असा एकमेव पदार्थ म्हणजे 'वडापाव'. वडापाव हा असा पदार्थ आहे की तो आपण कधीही आणि कुठेही खाऊ शकतो. शक्यतो बाहेर रस्त्याच्या कोपऱ्यावरील एखाद्या गाड्यावर किंवा टपरीवर वडापाव आणि सोबत चहा पिण्याची मज्जा काही औरच असते. बाहेर गाड्यावर मिळतो तसाच चविष्ट, खमंग, क्रिस्पी बटाटा वडा घरीच करण्यासाठी काही खास टिप्स(How to make the Perfect Batata Vada).
१. बटाटा वड्याचे बाहेरचे बेसनाचे आवरण तयार करताना बेसन पीठ आणि पाण्याच्या प्रमाणावर विषेश लक्ष द्यावे. जर बाहेरचे आवरण व्यवस्थित झाले नाही तर वडा चवीला चांगला लागणार नाही. बेसन पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे, ते मध्यम कंन्सिस्टंन्सीचे असावे.
२. बेसन पीठ भिजवताना त्यात हळुहळु पाणी घालावे आणि पीठ कालवून घ्यावे, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. या बेसन पिठात आवश्यक ते मसाले व थोडेसा ओवा घाला यामुळे बाहेरचे आवरण चवीला टेस्टी होते. बेसन पीठ भिजवून झाल्यावर ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे जेणेकरून बेसन छान भिजून फुलून येते.
३. बटाटा वडा तयार करताना बटाटे उकडवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित मॅश करावेत. मॅश करून घेतलेले बटाटे आधी थोडे थंड करावेत नंतरच त्यापासून बटाटे वडे तयार करावेत. बटाटा थंड करून घेतल्याने तो बेसन पिठात व्यवस्थित भिजला जातो.
४. मॅश करून घेतलेल्या बटाट्यात हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता असे काही ठराविक जिन्नस घालावेत, याने वड्याला आणखीनच चांगली टेस्ट येते.
५. बटाटा वड्याचे बाहेरचे बेसनाचे आवरण करताना त्यात २ ते ३ टेबलस्पून गरम तेल घालावे यामुळे आवरण खुसखुशीत होण्यास मदत होते. बेसन पिठात जास्त प्रमाणात तेल घालू नये नाहीतर ते गरजेपेक्षा जास्त पातळ होऊ शकते.
६. बटाटा वड्याचा आकार जास्त मोठा न ठेवता मध्यम ठेवावा. वडा खूप जास्त मोठा केल्यास तो आतून व्यवस्थित शिजत नाही, परिणामी वडा आतून कच्चा राहतो.
७. बटाटा वडा तळताना तो मंद आचेवर हळुहळु चमच्याने हलवत तळावा. मंद आचेवर बटाटा वडा तळल्याने तो आतून कच्चा न राहता व्यवस्थित तळून बाहेरुन परफेक्ट क्रिस्पी, खुसखुशीत होतो.