Join us   

How to Peel Coconut in 2 Minutes : फक्त २ मिनिटांत नारळ फोडण्याची सोपी ट्रिक; नारळ फोडण्याचं अवघड काम होईल एकदम सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 9:26 AM

1 / 7
स्वयंपाक करताना ओलं खोबरं लागतंच. पण नारळ फोडण्यापासून सोलण्यापर्यंत सगळ्याचीच तयारी करावी लागते. ऐनवेळी नारळं सोलायचं म्हणलं की खूपच वेळ लागतो. चवदार डाळीपासून ते बाप्पाच्या नैवेद्याच्या मोदकांपर्यंत अशा अनेक पदार्थांमध्ये खोबरं खूप वापरलं जातं. नारळ अगदी झटपट फोडण्याची सोपी ट्रिक पाहूया. (How To Remove Coconut Flesh From Shell in 2 Mins)
2 / 7
ताज्या नारळाचे वरचे केस काढून घ्या. नारळाला तीन डोळे असतात. या तीन डोळ्यांपैकी एक डोळा अतिशय मऊ असतो. मऊ डोळ्यात स्क्रू ड्रायव्हरसारखे टोचून त्यातून पाणी बाहेर काढा. (How to Peel Coconut Easily)
3 / 7
गॅसवर खोबरे मोठ्या आचेवर ठेवून गरम करा. स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने नारळ फिरवत राहा जेणेकरून नारळ सर्व बाजूंनी चांगले गरम होईल. (How to peel Coconut in super fast way)
4 / 7
गॅसवर गरम केल्यावरच नारळ फुटेल. नारळावर तडा दिसला तरीही खोबरे काही सेकंदांसाठी उच्च आचेवर ठेवा. यामुळे, नारळ सर्व बाजूंनी समान रीतीने गरम होईल आणि सहज सोलले जाईल.
5 / 7
गरम नारळावर थंड पाणी घाला. आजकाल प्रत्येक स्वयंपाकघरात एक सिंक असते. गरम नारळ स्क्रू ड्रायव्हरने धरून अर्धा मिनिट नळाच्या पाण्याखाली धरा.
6 / 7
आता नारळ थंड झालं असेल. नारळ आपल्या हाताने धरून, हळूहळू सर्व बाजूंनी गोलाकार फिरवत साल वेगळी करा.
7 / 7
नारळ सोलण्याचा हा उपाय तुमचं काम सोपं करेल आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळही वाचेल.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.