Join us   

स्वयंपाक खूपच उरला? अन्न वाया न घालवता करा ६ चमचमीत पदार्थ- बघता बघता होतील फस्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2024 1:02 PM

1 / 9
कधी कधी स्वयंपाक खूपच उरतो. आपण एकदा ते सगळे पदार्थ खाल्लेले असतात, म्हणून पुन्हा ते खावे वाटत नाहीत आणि टाकूनही द्यावे वाटत नाहीत. कारण अन्न वाया घालवू नये, असे संस्कार आपल्यावर लहानपणापासून झालेले असतात. (How to reuse leftover food?)
2 / 9
म्हणूनच अशा उरलेल्या स्वयंपाकाचं काय करायचं, याच्या या काही साध्या सोप्या टिप्स पाहा. उरलेल्या पदार्थांपासून नव्या चवीचे चटपटीत, चमचमीत नवे पदार्थ कसे करायचे ते पाहा. या काही ट्रिक्स पाहून घेतल्या तर तुमच्या घरात अन्न कधीच वाया जाणार नाही. (best use of left over food)
3 / 9
जर पोळ्या खूप उरल्या असतील तर त्याचे लहान- लहान तुकडे करून तळून घ्या. त्यावर बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो, बारीक शेव थोडा चाट मसाला टाका. अतिशय खमंग कुरकुरीत लागतात. लहान मुलांनाही खूप आवडतील. (tasty delicious cooking options from leftover food)
4 / 9
जर भात उरला असेल तर त्यामध्ये थोडं तिखट, मीठ, मसाला, कोथिंबीर- लसूण- मिरचीची पेस्ट टाका. सगळं मिश्रण कालवून घ्या आणि त्या भाताचे वडे किंवा सांडगे करून उन्हात वाळत घाला. पुणपणे वाळल्यानंतर ते तळून खा. तोंडी लावायला छान पदार्थ होईल.
5 / 9
भाज्या उरल्या असतील तर त्यात कणिक आणि रवा टाकून मळून घ्या आणि त्याच्या पुऱ्या करा. या खमंग पुऱ्या लोणचं, चटणी, सॉससोबत छान लागतील.
6 / 9
वरण किंवा आमटी उरली असेल तर त्यात ज्वारीचं पीठ, बेसन, कणिक घाला आणि त्याचे थालिपीठ करा किंवा पराठे लाटा.
7 / 9
ताक खूप उरलं असेल किंवा तुम्हाला ते प्यायला आवडत नसेल तर त्यात ज्वारीचं पीठ, बेसन, कणिक घाला. कोथिंबीर- लसूण- हिरव्या मिरचीची पेस्ट करून टाका. थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मळून घ्या. या पीठाच्या पुऱ्या करा. ताकातल्या या पुऱ्या चवीला अतिशय छान लागतात.
8 / 9
शेंगदाण्याची, खोबऱ्याची दह्यात कालवलेली ओली चटणी उरली असेल तर त्याचा उपयोगही करता येतो. कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घ्या आणि त्या उभ्या कापा. तुमच्या उरलेल्या चटणीमध्ये त्या मिरच्या घोळवून घ्या आणि नंतर उन्हात वाळायला घाला. मिरच्या छान वाळल्यावर तुम्ही त्या तळून खाऊ शकता.
9 / 9
जे पदार्थ खराब झाले असतील ते सरळ पाण्यामध्ये मिसळून झाडांना घाला. झाडांसाठी ते खूप चांगलं खत आहे.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती