लसूण सोलण्याची आणि साठवण्याची ही घ्या १ सोपी ट्रिक, वर्षभरही उत्तम राहिल सोललेला लसूण Published:December 5, 2022 12:01 PM 2022-12-05T12:01:45+5:30 2022-12-06T15:55:09+5:30
How to Store Fresh Garlic : मिक्सरमध्ये थोडं मीठ घालून लसूण बारीक करा. जर तुम्ही सोललेल्या लसणाच्या 1 कप पाकळ्यांची पेस्ट बनवत असाल तर त्यात 1 चमचे मीठ घाला. लसूण सोलणं आणि दीर्घकाळ स्टोअर करून ठेवणं हे खूपच कठीण काम. (Kitchen Hacks) लसूण एक असा पदार्थ आहे जो जवळपास सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात असतो. लसूण जेवणात घातला नाही तर जेवणाला चव येत नाही. अनेकदा लसूण बाजारात स्वस्त झाले असले की भरपूर प्रमाणात घेतले जातात पण खराब झाल्यानं फेकावे लागतात. लसूणांचा रंग काळपट पडतो तर कधी ते सुकतात. (5 easy tips to store peeled garlic from 1 week to 1 year)
सोललेले लसूण १ आठवडा चांगले ठेवण्यासाठी काय करायचं?
खूप लोक विकेंडला वेळ मिळाल्यानंतर लसूण सोलून ठेवतात आणि पूर्ण आठवडाभर वापरतात. ही एक सोपी पद्धत आहे. एका एअरटाईट बरणीत तुम्ही सोललेले लसूण साठवून ठेवू शकता. डब्यात ओलसरपणा नसेल याची काळजी घ्या. कारण यामुळे लसूण लवकर खराब होतील.
सोललेले लसूण २ ते ३ आठवडे साठवण्याची ट्रिक
सोललेले लसूण २ ते ३ आठवडे साठवून ठेवण्यासाठी सगळ्यात आधी व्यवस्थित कापून घ्या. त्यानंतर कढईत १ चमचे तेल गरम करून लसूण त्यात घाला थोडं मीठ घाला. मीठ प्रिजर्व्हेटिव्हचं काम करते. ज्यामुळे तुम्ही लसूण जवळपास २ ते ३ आठवडे साठवून ठेवू शकता. त्यासाठी लसूण व्यवस्थित भाजून घ्या.
लसणाची पेस्ट बनवून साठवा
मिक्सरमध्ये थोडं मीठ घालून लसूण बारीक करा. जर तुम्ही सोललेल्या लसणाच्या 1 कप पाकळ्यांची पेस्ट बनवत असाल तर त्यात 1 चमचे मीठ घाला. या लसूण पेस्टमध्ये दोन चमचे मोहरीचे तेल टाकून साठवा.
तुम्ही एका लहान हवाबंद कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये 1 महिन्यापर्यंत साठवू शकता. जर तुम्हाला मसालेदार करी बनवायची असेल तर ही एक उत्तम किचन ट्रिक आहे.
१ वर्ष लसणाची पेस्ट कशी साठवून ठेवायची
यासाठी सगळ्यात आधी लसणाची पेस्ट बनवून घ्या त्यानंतर एक पारदर्शी शीट (फ्लेक्सिबल सेलोफोम शीट) एका प्लेटमध्ये ठेवून ही पेस्ट त्यावर लहान गोळ्यांच्या आकारात ठेवा. एक दिवस उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. असे केल्याने लसणाच्या पाकळ्या तपकिरी होतील.
फक्त 1 दिवसाच्या सूर्यप्रकाशात, लसूण पेस्ट इतकी सुकते की तुम्ही ती एका वर्षासाठी साठवून ठेवू शकता. ते हवाबंद डब्यात साठवा आणि जेव्हा तुम्हाला ते वापरायचे असेल तेव्हा लगेच बाहेर काढा आणि गरम तेलात घाला. तुमच्या जेवणाला चव जशी हवी तशी येईल.
गार्लिक पावडर
जर तुम्हाला बाजारातून लसूण पावडर विकत घेण्याऐवजी घरच्या घरी खूप चवदार लसूण पावडर बनवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला वरील स्टेपमध्ये बनवलेले लसूण बारीक करून सुकवून घ्यावे लागतील.
लसूणाची पेस्ट तुम्ही क्यूब स्वरूपात साठवू शकता आणि लागेलं तसं एक एक क्यूब वापरू शकता.