डाळींना भुंगा लागतो, तांदुळात अळ्या होतात? ४ टिप्स- धान्य अजिबात खराब होणार नाही
Updated:April 5, 2025 18:13 IST2025-04-05T17:10:34+5:302025-04-05T18:13:55+5:30

वारंवार बाजारात जाऊन आणायला नको म्हणून आपण डाळ, तांदूळ एकदाच घेऊन साठवून ठेवतो. पण त्याचा नेमका उलटाच परिणाम होतो आणि डाळींना भुंगा लागतो तर तांदळात किडे, अळ्या होऊ लागतात.
असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं आणि कोणत्या डाळीमध्ये कोणते पदार्थ घालून ठेवायचे, याविषयीची माहिती आता पाहूया.. ही माहिती homestylebysheela या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तांदळात किडे होऊ नये म्हणून तांदळाच्या बरणीमध्ये तेजपान घालून ठेवावे.
हरबऱ्याच्या डाळीमध्ये किडे होऊ नयेत म्हणून बरणीमध्ये डाळ भरताना त्यात थोड्या वाळलेल्या लाल मिरच्या टाकून ठेवा.
मसूर डाळीच्या डब्यात लसूण पाकळ्या घालून ठेवल्याने डाळीला भुंगे होणार नाहीत.
उडीद किंवा तूर डाळीला किडे लागू नये म्हणून बरणीमध्ये हळकुंड घालून ठेवावे. धान्य जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.