How to store leftover bottle gourd or lauki for long, how to prevent leftover lauki from getting red
उरलेला दुधी भोपळा लालसर पडून खराब होतो? २ सोपे उपाय- ४ ते ५ दिवस राहील फ्रेशPublished:November 26, 2024 01:26 PM2024-11-26T13:26:41+5:302024-11-26T13:33:09+5:30Join usJoin usNext दुधी भोपळा घेतल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की तो आकाराने खूप मोठा असल्यामुळे सगळा एकदम वापरला जात नाही. त्यामुळे आपण तो गरजेपुरता घेतो आणि उरलेला फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण फ्रिजमध्ये अर्धवट चिरून ठेवलेला दुधीभोपळा काही तासांतच लालसर होतो. त्या भागात तो थोडा खराब होऊन मऊ पडतो. असं होऊ नये म्हणून काय करावं, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की सगळ्यात आधी तर दुधी भोपळ्याचा जो कापलेला भाग आहे, त्यावर थोडं लिंबू चोळा. किंवा त्या भागात लिंबाचा रस लावा. त्यानंतर त्या भागावर ॲल्युमिनियम फॉईलचा छोटासा तुकडा गुंडाळा. ॲल्युमिनियम फॉईलऐवजी क्लिंग फॉईल किंवा क्लिन रॅपचाही तुम्ही वापर करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही दुधीभोपळा फ्रिजमध्ये ठेवला तर तो मुळीच खराब होणार नाही. टॅग्स :अन्नकिचन टिप्सभाज्याfoodkitchen tipsvegetable