Join us

फळांच्या परडीमध्ये ताडगोळा तर हवाच, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 13:49 IST

1 / 9
प्रत्येक ऋतूमध्ये काही खास फळे व भाज्या खायला मिळतात. सिझनल पदार्थ खाणे शरीरासाठी फार चांगले असते. प्रत्येकाने अशा फळांचा आस्वाद घ्यायलाच हवा.
2 / 9
उन्हाळ्यामध्ये फळांची मेजवानी आपण खातो. वर्षभरात खाल्ली नसतील एवढी फळे उन्हाळ्यामध्ये खाल्ली जातात. शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. फळांमधून पाणी तसेच अनेक पोषकतत्वे मिळतात.
3 / 9
ताडगोळा हे उन्हाळी फळ आहे. मार्च एप्रिलमध्ये जागोजागी ताडगोळे विक्रेत्यांच्या गाड्या लागलेल्या असतात. फार रसाळ आणि गोड असे हे फळ उन्हामुळे होणाऱ्या त्रासांची तीव्रता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
4 / 9
ताडगोळ्यांमध्ये जीवनसत्त्व 'सी' भरपूर प्रमाणात असते. तसेच जीवनसत्त्व 'बी' ही असते. या फळामध्ये पोटॅशिअम असते. कॅल्शिअम असते. तसेच लोह असते आणि खनिजेही असतात.
5 / 9
ताडगोळा नैसर्गिक थंडाव्याचा स्त्रोत आहे. पोटाला थंडावा देण्याचे काम हे फळ करते. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन आराम मिळण्यासाठी या फळाची मदत होते. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते.
6 / 9
उन्हामुळे चक्कर वगैरे येत असेल तर रोज एक ताडगोळा खाणे फायद्याचे ठरेल. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. या फळामध्ये अनेक गुणधर्म असतात.
7 / 9
अपचनाचा त्रास असल्यास ताडगोळा नक्की खायला हवा. पोट साफ होण्यासाठी मदत होते. पचनसंस्था अगदी व्यवस्थित चालते. बध्दकोष्ठतेचा त्रास असेल तर तो ही दूर होतो.
8 / 9
वजन कमी करण्यासाठी ताडगोळ्यांचा उपयोग होतो. पोटाला आधारही मिळतो आणि शरीराला पाणीही मिळते. मात्र वजन वाढवणाऱ्या घटकांचे प्रमाण या फळामध्ये अगदीच कमी असते.
9 / 9
ताडगोळे खाल्ल्याने स्नायूंचे आरोग्य सुधारते. मज्जातंतुंसाठीही हे फळ उत्तम असते. मधुमेहाचा त्रासही कमी होतो.
टॅग्स : समर स्पेशलअन्नहेल्थ टिप्सफळे