चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

Updated:February 7, 2025 13:34 IST2025-02-07T07:01:30+5:302025-02-07T13:34:22+5:30

Flowering Tea Health Benefits : 9 types of flower tea & their health benefits : Different Types of flower Tea & Their Health Benefits : आरोग्याच्या कोणत्या समस्येनुसार नेमका कोणत्या फुलांच्या पाकळ्यांचा चहा प्यावा ते पाहा...

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

'चहा' हे जगभरातील बहुतेक सगळ्यांच्याच आवडीचे एक खास पेय आहे. आजकाल बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेव्हर्सचे चहा अगदी सहज विकत मिळतात. सध्या आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या फुलांचा ( Different Types of flower Tea & Their Health Benefits) चहा घरोघरी तयार करून प्यायला जातो. नेहमीचा दुधाचा चहा पिण्यापॆक्षा आपण घरच्याघरीच वेगवेगळ्या फुलांचे चहा ( 9 types of flower tea & their health benefits) करुन पिऊ शकतो. आपल्या शरीराच्या कोणकोणत्या समस्येनुसार नेमका उपाय म्हणून कोणत्या फुलांच्या पाकळ्यांचा चहा प्यावा ते पाहूयात.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

गोकर्ण फुलांचा चहा हा गोकर्णांच्या फुलांप्रमाणेच छान मस्त निळाशार होतो. गोकर्णांच्या फुलांचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. यासोबतच, रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात ठेवता येते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यासोबतच, वजन कमी करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

कॅमोमाइल फुलांचा चहा नियमित प्यायल्याने डोकेदुखी कमी होण्यासोबतच पचनास मदत देखील करतात. याचबरोबर, मासिक पाळीचे क्रॅम्पस देखील कमी करण्यास फायदेशीर ठरते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

चहा करताना आपण त्यात गुलाबाच्या पाकळ्या देखील घालू शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचबरोबर स्ट्रेस कमी करण्यास मदत करते. घसा खवखवत असेल किंवा जळजळ होत असेल तर गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा पिणे अधिक लाभदायक ठरते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

चमेलीचा चहा प्यायल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. याचबरोबर, सर्दी आणि फ्लूशी लढण्यास अधिक मदत करते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

लॅव्हेंडरचा चहा प्यायल्याने निद्रानाशाची समस्या कमी होते. एवढंच नव्हे तर डोकेदुखी कमी करुन आपला मूड रिफ्रेश करते ज्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

केशरच्या फुलांच्या पाकळ्यांचा चहा प्यायल्याने स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. सोबतच, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास सेन्ना फुलांचा चहा पिणे अधिक उपयोगी ठरते. आपले संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी सेन्ना फुलांचा चहा पिणे अतिशय फायदेशीर ठरते.

चहा प्या चहा, फुलांचा चहा! ९ सुगंधी फुलांचा ‘असा’ चहा, शरीर आणि मन होईल फ्रेश...

मोरिंगा फुलांच्या चहामध्ये भरपूर प्रमाणांत जीवनसत्वे आणि खनिजे असतात. याचसोबत, वजन कमी करण्यासाठी मदत होते तसेच आपल्या शरीरातील हाडांना मजबुती देण्याचे महत्वाचे काम करते.