स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 6:01 PM 1 / 7आपला नेहमीचा स्वयंपाक करताना थोड्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तो नक्कीच जरा वेगळ्या चवीचा आणखी स्वादिष्ट होतो.त्या ट्रिक्स नेमक्या कोणत्या आहेत, ते आता पाहूया...2 / 7यापैकी सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसूरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल.3 / 7भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालविण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल.4 / 7पुऱ्या खूप तेल पितात, अशी तुमचीही तक्रार असेल तर हा उपाय करून पाहा. पुऱ्या लाटून घ्या आणि नंतर १० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर तळायला घ्या. तेल खूप कमी लागेल.5 / 7 बऱ्याचदा भाजी करपते. मग तिला करपट वास लागतो. तो वास घालविण्यासाठी भाजीमध्ये थाेडं दही घाला. वास निघून जाईल आणि भाजी स्वादिष्ट होईल.6 / 7पनीर खूपच कडक, वातड झालं असेल तर गरम पाण्यात थोडं मीठ घाला आणि त्यात १० मिनिटांसाठी पनीर ठेवून द्या. पनीर अगदी मऊ होईल. 7 / 7कणिक उरली असेल तर तिला तूप लावा आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कणिक काळी पडणार नाही आणि पोळ्याही मऊ होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications