Join us   

Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिन स्पेशल तिरंगा रेसिपी! तीन रंगांचे खास पदार्थ, तुम्ही काय स्पेशल करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 8:10 PM

1 / 8
१. काही काही व्यक्तींची कल्पकता इतकी भन्नाट असते, की आपण विचारही करू शकत नाही, असे वेगवेगळे पदार्थ ते अतिशय नाविण्यपूर्ण पद्धतीने तयार करतात... आता हेच बघा ना, स्वातंत्र्यदिन स्पेशल तिरंगा पदार्थ किती वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतात....
2 / 8
२. हा एक सोपा आणि अनेक जणांना माहिती असणारा पदार्थ. तिरंगा सॅण्डविज. टोमॅटो सॉस, पुदिना चटणी आणि मेयोनिज हे ३ पदार्थ वापरून हे सॅण्डविज तयार करता येतं.
3 / 8
३. स्वातंत्र्यदिनानिमित्त हा खास तिरंगा केक. हा केक तयार करण्यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचे वेगवेगळे बेस तयार करून घ्या आणि नंतर ते एकावर एक ठेवून त्यावर क्रिम लावा. वरून दिसायला हा केक सर्वसामान्य दिसत असला तरी कापाल तेव्हा त्यात तिरंग्याचे तीन रंग दिसतील.
4 / 8
४. हा एक किती छान प्रयोग आहे बघा. तिरंगा इडली. ही इडली तयार करण्यासाठी इडलीच्या पीठाचा एक भाग पांढरा, एक हिरवा आणि एक केशरी ठेवा. इडली पात्रात अगदी सावकाश हे तीन पीठ टाका. पीठ थोडं घट्टच ठेवा म्हणजे मग ते टाकल्याटाकल्या लगेच एकत्र होणार नाही.
5 / 8
५. हा आहे तिरंगा ढाेकळा. ढोकळा लावतानाच त्याचा बेस तीन रंगाचा करा आणि लावा.
6 / 8
६. तिरंगा राईस हा एक चवदार पदार्थ. साधा भात तयार करा. त्याचे ३ भाग करा. एकात केशरी रंग टाका तर दुसऱ्यामध्ये हिरवा रंग टाका. दोन्ही भातांना छान तडका द्या. तिरंगा राईस झाला तयार.
7 / 8
७. पुऱ्यांचा हा प्रकारही बघा किती छान आहे. एक आपली साधी पुरी. दुसऱ्या पुरीत केशरी रंग टाकला आहे तर तिसरी पुरी पालकाची केली आहे.
8 / 8
८. हा आहे तिरंगा लाडू... रव्याचे पांढरे लाडू करतानाच सारणाचे ३ भाग करा. एक भाग पांढराच राहू द्या तर उर्वरित दोन भागांमध्ये केशरी आणि हिरवा रंग टाकून असे वेगवेगळ्या ३ रंगांचे लाडू वळा.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.स्वातंत्र्य दिन