Join us   

१ कप कॉफी पिण्याचे जबरदस्त फायदे; नेहमी स्ट्रेस-फ्री राहाल, आजार होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 3:30 PM

1 / 8
कॉफी (Coffee) हा असा पदार्थ आहे जो आपली चव आणि सुगंधामुळे मोठ्या प्रमाणात प्यायली जाते. कॉफी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात कर कॉफीच्या अति सेवनामुळे तब्येतीवरही परिणाम होतो. रोज सकाळी कॉफी प्यायल्याने शरीरात कोणते बदल जाणवतात ते समजून घेऊ. (Coffee pinyache fayde)
2 / 8
कॉफीला कॉफिया अरेबिका (Coffea Arabica) नावाच्या झाडाला लागणाऱ्या फळापासून तयार केले जाते. या शेंगांना भाजून नंतर वाटून कॉफी पावडर तयार केली जाते. (8 Health Benefits of Coffee)
3 / 8
कॉफी प्यायल्याने शरीर ताजेतवानवे राहते आणि उर्जा मिळते. थकवा दूर होतो. दिवसभर शरीर एर्नेजेटिक राहते. आळस दूर होतो आणि मेंदू अधिक एक्टिव्ह होतो.
4 / 8
जर तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल तर बिना साखरेची कॉफी प्या. व्यायामाला सुरूवात करण्याआधी तुम्ही कपभर ब्लॅक कॉफी प्यायलात तर जास्तीत जास्त फॅट्स बर्न होण्यास मदत होईल.
5 / 8
एनसीबीआयच्या रिसर्चनुसार रोज १ कप कॉफी प्यायल्यानं टाईप २ डायबिटीसचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. कॉफीच्या सेवनाने इंसुलिन संवेदनशिलतेत सुधारणा होते. ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.
6 / 8
कॉफी प्यायल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होते. ताण तणाव कमी करण्यास कॉफी महत्वाची भूमिका बजावते. कॉफीची चव, ताण-तणाव आणि चिंताग्रस्तेपासून आराम देण्यास मदत करते. संशोधनानुसार ज्या महिला कॉफी पितात त्या जास्त तणावमुक्त असतात.
7 / 8
कॉफी त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. कॉफी प्यायल्याने त्यातील कॅफिन रक्तातील मायक्रोसर्क्युलेशन वाढवते आणि 5-α-रिडक्टेस एक्टिव्ह ककरते. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते.
8 / 8
कॉफीचे शरीराला बरेच फायदे होत असले तरीही २ कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका याचा तब्येतीवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स