तुम्हीही पाश्चराईज दूध उकळल्यानंतरच मुलांना प्यायला देता? तज्ज्ञ सांगतात हे अतिशय चुकीचं, कारण.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 12:35 PM 1 / 6हल्ली बहुतांश घरांमध्ये दुकानांमध्ये विकत मिळणाऱ्या पॅक दूध बॅग आणल्या जातात. त्या बॅगवर pasteurized milk असं लिहिलेलं असतं. 2 / 6कच्चं दूध प्यायचं नाही, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण दुधवाल्याने दिलेलं किंवा मग डेअरीमधून सुटं घेतलेलं दूध तापवून, उकळवून घेतो. ते योग्यच आहे. पण पाश्चराईज मिल्कच्या बाबतीत असं करण्याची गरज नाही, असं डॉक्टर सांगतात. (Is it okay to boil pasteurized milk?)3 / 6याविषयीचा एक व्हिडिओ बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकित गुप्ता यांनी drankit.jivishaclinic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये ते सांगतात की पाश्चराईज दूध उकळून, थंड करून मुलांना देत असाल तर ते चुकीचं आहे. (What happened if we boil pasteurized milk?)4 / 6कारण पाश्चराईज दुधावर जी प्रक्रिया केलेली असते त्यामध्ये ते दूध खूप जास्त तापमानावर उकळलं जातं आणि त्यानंतर ते लगेचच प्रक्रिया करून थंड केलं जातं. यामुळे मग त्यातील बॅक्टेरिया, जंतू नष्ट हाेतात.5 / 6त्यामुळे जर तुम्ही ते पुन्हा उकळवत असाल तर त्यातील अनेक पौष्टिक, व्हिटॅमिन्स कमी होत जातात. त्यामुळे पाश्चराईज दूध असं लिहिलेल्या पिशव्यांमधील दूध पुन्हा उकळविण्याची गरज नाही. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गरम दूध पिण्याची सवय असेल तर ते १- २ मिनिटे गॅसवर गरम करून प्या. 6 / 6आता साय येण्यासाठी आपण दूध उकळतो. त्या उद्देशाने तुम्ही ते उकळून घेत असाल तर ठीक आहे. पण साय येऊ देऊन त्याचं तूप करायचं नसेल तर मात्र पाश्चराईज दूध न उकळता प्यायलेलं चांगलं. आणखी वाचा Subscribe to Notifications