तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

Published:July 20, 2024 04:51 PM2024-07-20T16:51:06+5:302024-07-20T16:57:05+5:30

तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

पावसाळा जितका हवाहवासा वाटतो, तितकाच तो कधी कधी तापदायक ठरतो. कारण या दिवसांत अन्नपचनाचे त्रास वाढलेले असतात. थोडंसं खाण्यात कमी- जास्त झालं की लगेच अपचन, ॲसिडिटी, मळमळ, उलट्या असा त्रास होतो.

तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

शिवाय या दिवसांत संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्याची पथ्ये जरा जास्तच काळजीपुर्वक पाळावी लागतात. असंच काहीसं पालेभाज्यांचंही आहे. पावसाळ्यात सलाड आणि त्यातही कच्च्या पालेभाज्या खाऊ नयेत किंवा खूप कमी प्रमाणात खाव्या , असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात.

तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

याविषयी आहारतज्ज्ञ अनिता गद्रे यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या असं सांगत आहेत की या दिवसांत पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या खूप व्यवस्थित काळजीपुर्वक धुवून घ्या. कारण या दिवसांत त्यांच्यावर खूप जास्त बॅक्टेरिया असतात.

तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

तसेच पावसाळ्यात अनेक पालेभाज्यांना खूप जास्त प्रमाणात माती लागलेली दिसते. अशावेळी आपण त्या धुण्यात जर कमी पडलो तर पोटदुखी, उलट्या, मळमळ, अपचन असे त्रास होऊ शकतात.

तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

या दिवसांमध्ये पालक आणि मेथी तसेच इतर पालेभाज्या जरा कमी प्रमाणातच असतात. त्यामुळे त्या तुमच्या खाण्यात आल्या नाहीत तर त्याऐवजी टाकळा, फोडशी, कंटुर्ली अशा तुमच्या भागात मिळणाऱ्या रानभाज्या अधिकाधिक प्रमाणात खा. कारण या रानभाज्याही तुम्हाला पालेभाज्यांप्रमाणेच अनेक पौष्टिक घटक देतात.