गोकुळाष्टमी: नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ पदार्थ, आवडत्या कान्हासाठी खास बेत
Updated:September 5, 2023 18:45 IST2023-09-05T18:38:27+5:302023-09-05T18:45:54+5:30

१. गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णासाठी नैवेद्य केला जातो. काही हौशी घरांमध्ये तर देवाला ५६ भोग दाखवले जातात. आता प्रत्येकाकडेच एवढा वेळ नसतो. त्यामुळे जर देवासाठी झटपट नैवेद्य तयार करायचा असेल तर हे काही पदार्थ तुम्ही करू शकता...
२. शेंगदाण्याचा लाडू झटपट करता येतो. शेंगदाणे भाजायचे. थंड झाले की शेंगदाणे, खोबरे, गूळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. त्याला थोडासा तुपाचा हात लावून लाडू वळले की झाला नैवेद्य तयार. अगदी १० मिनिटांत हा नैवेद्य तयार होतो.
३. शेंगदाण्याच्या लाडूप्रमाणे सुकामेव्याचा लाडूही झटपट करता येतो. यासाठी बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड सम प्रमाणात घ्या. हा सुकामेवा जर एक वाटी असेल तर त्याला १ वाटी खजूराचे काप आणि अर्धी वाटी तूप टाका. सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि त्याचे लाडू वळा.
४. मखाना खीर, शेवयाची खीर, वळवटाची खीर असे खीरीचे नैवेद्यही कमी वेळेत करता येतात.
५. रव्याचा साजूक तुपातला शिरादेखील झटपट होऊ शकतो. याशिवाय गाजराचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवाही कमी वेळेत करता येईल.
६. मिल्क पावडरचा पेढाही घरच्याघरी छान होतो. यासाठी १ वाटी मिल्क पावडर, पाव वाटी तूप, पाव वाटी साखर, आणि अर्धी वाटी दूध लागेल. आधी तूप आणि मिल्क पावडर एकत्र करून परतून घ्या. ते लालसर झालं की त्यात दूध टाका. दुध आळून आलं की साखर टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण आळून येऊ द्या. थंड झालं की त्याचे गोलाकार पेढे वळा.