Join us   

करंज्या तळताना फुटतात, कधी खुळखुळा होतो? ५ टिप्स, करा परफेक्ट खुसखुशीत करंज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 3:01 PM

1 / 7
दिवाळीच्या (Diwali 2022) फराळ्याच्या ताटात करंजी असतेच. अगदी जास्त नाही केल्या तरी घरापुरत्या ५, १० कंरज्या अनेकजणी करतात. फराळ व्यवस्थित झाला नाही तर घरातली मंडळी जास्त खात नाही आणि सामानाचे पैसेही वाया जातात. करंजा बनवायला खूपच वेळ लागतो म्हणून अनेकजण करंजी बनवणं टाळतात. (Diwali Faral Recipe)
2 / 7
करंज्या तेलात फुटू नयेत, आतल्या सारणाचा खुळखुळा होऊ नये म्हणून बनवण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. परफेक्ट करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स या लेखात पाहूया (How to make perfect karanji)
3 / 7
१) कंरजी तेलात फुटू नये म्हणून नेहमी मंद आचेवर तळण्याचा प्रयत्न करावा. पीठ मळताना तेलाचं मोहन, मीठ, पाणी एकत्र करून घ्यावे आणि त्यात मैदा घाला.
4 / 7
२) करंजी खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळण्याआधी मोहन तुपाचे घालावे. चांगले तूप नसल्यास तेलाचं मोहनही घालू शकता. मोहन थंड झाल्यावर पीठ चांगलं मळून घ्यावे.
5 / 7
३) करंजीच्या वरच्या भागासाठी भिजवलेलं पीठ जास्त कडक होऊ नये म्हणून पीठ भिजवल्यानंतर सुती कपडा ओला करुन तो त्याभोवती गुंडाळून ठेवा. त्यामुळे शेवटपर्यंत पीठ मऊ राहील.
6 / 7
४) करंज्या मऊ झाल्या तर सरळ ओव्हनमध्ये खाण्यापूर्वी गरम करुन घ्या. कडक होतील. आणि ओव्हन नसेल तर तवा चांगला तापवून, गॅस मंद करुन, त्यावर ताटलीत ठेवा.. किंवा गॅस बंद करुन डायरेक्ट तव्यावर ठेवा, छान खरपूस लागतील.
7 / 7
५) करंजीच्या सारणासाठी पिठी साखर घरी बनवा. ती विकत आणल्यास काही वेळेस त्यात ओलसरपणा असेल, तर त्याला वास येऊ शकतो.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सदिवाळी 2022