Join us   

घरच्याघरी फक्त १० रुपये खर्च करुन बनवा कसुरी मेथी; वर्षभर टिकेल, बघा कशी करायची..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 4:46 PM

1 / 9
हिवाळा सुरू झाला असून बाजारात हिरव्या भाज्या मिळाल्या सुरूवात झाली आहे. थंडीच्या दिवसात हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात दिसतात. या दिवसात गरमागरम मेथीचे पराठे खूप खाल्ले जातात.
2 / 9
शंकरपाळी असो किंवा मेथीचे थेपले, डाळ असो यात कसुरी मेथी घातल्यानंतर वेगळीच चव येते. पण विकतच्या कसुरीमेथीमध्ये आपल्याला हवा तसा फ्लेवर मिळेलच असं नाही.
3 / 9
हिवाळ्याच्या दिवसात फ्रेश मेथीपासून तुम्ही घरीच कसुरीमेथी बनवू शकता ही मेथी वर्षभर टिकेल आणि ताजा फ्लेवर पदार्थाला मिळेल.
4 / 9
तुम्ही कसुरी मेथी किंवा सुकी मेथी दोन पद्धतींनी बनवू सकता. पहिली पद्धत झटपट आहे आणि एक पद्धत अशी आहे की मेथी 2 दिवस उन्हात ठेवावी लागेल. त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या. ही मेथी तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये वापरू शकता.
5 / 9
कसुरी मेथी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मेथीची जुडी घ्या आणि पानांचे देठ बाहेर काढा त्यानंतर मेथीची पानं कागदावर किंवा सुती कापडावर पसरवा.
6 / 9
ही पानं दोन ते तीन दिवस कडक उन्हात ठेवा आणि सुकल्यानंतर घट्ट डब्यात भरून ठेवा. आपण मेथी सुकवण्यासाठी मायक्रोवेव्ह देखील वापरू शकता. यासाठी मेथीची पाने पाच मिनिटे मायक्रोवेव्ह करावी. या दरम्यान मेथी चमच्याने मधोमध हलवा आणि दोन मिनिटे मायक्रोवेव्ह पुन्हा चालू करा.
7 / 9
मायक्रोवेव्ह बंद केल्यानंतर मेथी दहा मिनिटे आत राहू द्या. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की मेथीची पाने पूर्णपणे सुकलेली आहेत. त्यांना आपल्या हातांनी मॅश करा आणि घट्ट डब्यात ठेवा.
8 / 9
कसुरी मेथी तुम्ही कोणत्याही प्रकारे वापरू शकता. ग्रेव्हीच्या भाजीला हॉटेलसारखी चव आणण्यासाठी भाजी तयार करताना कसुरी मेथी हाताने थोडी मॅश करून घाला.
9 / 9
मेथी पराठ्यासाठी पीठ मळताना त्यात थोडी कसुरी मेथी घाला, त्यामुळे पराठ्याची चव दुप्पट होईल. याचा वापर तुम्ही वर्षभर डाळ, भाजी, पराठे किंवा नान बनवण्यासाठी करू शकता.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न