दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

Published:August 6, 2022 08:10 AM2022-08-06T08:10:10+5:302022-08-06T08:15:02+5:30

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

१. दूध तापवलं की त्यावर भरपूर साय यावी असं वाटतं.. कारण साय भरपूर आली तर तिचं विरझण चांगलं लावता येतं आणि त्यापासून मग चांगलं तूप बनवता येतं..

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

२. सायीचं प्रमाण वाढलं की तुपाचंही प्रमाण वाढतंच.. तेवढंच विकतचं तूप आणण्याचा खर्चही कमी होतो. त्यामुळे दुधावर कशी भरपूर साय यावी, अशी इच्छा जवळपास सगळ्याच महिलांची असते.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

३. म्हणूनच तर दुधावर येणाऱ्या सायीचं प्रमाण वाढविण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय. तुम्ही दूध कसं उकळवता, किती वेळ उकळवता आणि त्यानंतर त्याचं काय करता यावर साय किती प्रमाणात येणार हे अवलंबून असतं.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

४. सगळ्यात आधी तर हा बेसिक नियम आपल्याला माहितीच आहे की दूध जेवढं तापवतो तेवढं ते आटतं आणि त्यातलं सायीचं प्रमाण वाढतं. म्हणूनच सगळ्यात आधी ही एक गोष्ट लक्षात घ्या की दुधाला थोडी उकळी येऊ द्या. काही घरांमध्ये दूध उतू येतंय असं दिसलं की लगेच गॅस बंद करून टाकला जातो. पण असं करणं टाळा. उतू येऊ लागलं तर वरची साय बाजूला करा आणि त्यानंतर ५ ते १० मिनिटे दूध उकळू द्या.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

५. साय जास्त येण्यासाठी गॅस कसा ठेवावा, याचं एक गणित लक्षात घ्या. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही दूध गॅसवर तापायला ठेवाल तेव्हा सुरुवातीला गॅस मोठा ठेवा. मोठ्या गॅसवर दूध लगेच उतू जातं. त्यामुळे तुम्हाला दूध तापेपर्यंत त्याच्याजवळ थांबण्याएवढा वेळ असेल तरच हा प्रयोग करा. जेव्हा गॅस मोठा असेल आणि दूध हळूहळू वर येतंय हे लक्षात आलं की गॅस मध्यम आचेवर घ्या आणि दुधावरचा सायीचा पापुद्रा चमच्याने बाजूला करा. एखादा मिनिट दूध मध्यम गॅसवरच राहू द्या आणि वर येतंय असं वाटलं की चमच्याने लगेच हलवा. त्यानंतर गॅस एकदम मंद करून टाका आणि मंद गॅसवर साधारण १० मिनिटे तरी दूध उकळू द्या. या पद्धतीने तापवलेल्या दुधावर निश्चितच अधिक साय येईल.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

६. दूध तापवून गॅस बंद केला की त्यावर लगेच झाकण ठेवू नका. १० ते १५ मिनिटे दूध तसेच उघडे ठेवा.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

७. त्यानंतर त्यावर झाकण म्हणून एखादी जाळीदार प्लेट किंवा चाळणी ठेवा.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

८. दूध कोमट झालं की ते फ्रिजमध्ये अलगद ठेवून द्या. दुधाला अजिबातच हिंदकळा बसू देऊ नका.

दुधावर येईल भरपूर साय, फक्त दूध तापवताना लक्षात ठेवा 5 सोप्या ट्रिक्स, मलाई दाट...

९. साय जास्त यावी असं वाटत असेल तर अशा पद्धतीने उकळलेलं दूध लगेचच पिण्यासाठी, चहासाठी वापरू नका. ते फ्रिजमध्ये ४ ते ५ तास ठेवा. त्यावर साय आली की त्यानंतरच ते पिण्यासाठी, चहासाठी वापरा.