फ्रिजसारखं गार होईल माठातलं पाणी, ९ टिप्स-भर उन्हात माठातल्या गारेगार पाण्याला तोड नाही!
Updated:March 1, 2025 12:03 IST2025-03-01T11:52:20+5:302025-03-01T12:03:55+5:30
Kitchen Tips Tricks To Keep Water Cool In Earthen Pot Matka This Summer : Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge : उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी काहीवेळा गरम होते, यासाठीच माठातील पाणी गार करण्याच्या सोप्या ट्रिक्स...

उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमीच थंड पाणी पिण्याची इच्छा होते. तब्येतीच्या समस्यांमुळे(Kitchen Tips Tricks To Keep Water Cool In Earthen Pot Matka This Summer) आपण शक्यतो फ्रिजचं पाणी पिणे टाळतो, कारण यामुळे अनेक प्रकारे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, माठातलं पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. असे असले तरीही माठातलं पाणी गरम असेल तर ते सुद्धा पिण्याची इच्छा होत नाही. माठातलं पाणी फ्रिजच्या पाण्यासारखं ठंड करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता, या ट्रिक्स नेमक्या कोणत्या ते पाहा.
१. आपण विकत आणलेला मातीचा माठ हा खरंच मातीचा (Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge) आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी माठ चमच्याने वाजवून पाहावा.
२. आता आपण ज्या स्टँडवर मातीचा माठ ठेवतो त्या स्टँडवर मातीचा माठ ठेवण्याआधी मातीची छोटीशी कुंडी ठेवावी. ही कुंडी मातीने भरलेली असावी. मातीने भरलेली कुंडी ठेवल्यानंतर माती भिजून ओली होईल इतके पाणी त्यात घालावे. त्यानंतर या कुंडीवर आपला पाण्याने भरलेला मातीचा माठ अलगद ठेवून द्यावा. भिजलेल्या मातीच्या ओलाव्याने माठाचा पृष्ठभाग कायम थंडगार राहण्यास मदत होते, यामुळे आतील पाणी थंड राहते.
३. एक कॉटनचा टॉवेल किंवा सुती कापड घेऊन ते संपूर्णपणे पाण्याने भिजवून घ्यावे. हे भिजवून घेतलेले कापड माठाच्या बाहेरील बाजूने माठाला संपूर्णपणे गुंडाळून घ्यावे. यामुळे माठातील पाणी जास्त काळासाठी थंडगार राहते.
४. माठ खिडकीजवळ हवा लागेल असा ठेवा पण त्या जागी ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी. तशी जागा नसल्यास माठ काळोखाच्या ठिकाणी किंवा जेथे ऊन आणि गॅसची झळ लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. यामुळे मठांतील पाणी हवेमुळे थंड राहील.
५. माठ दररोज स्वच्छ करा. त्याचबरोबर त्यात रोज नवीन स्वच्छ पिण्याचे पाणी भरा, जेणेकरून पाणी गार राहण्यास मदत होईल.
६. मातीच्या भांड्याला खूप लहान छिद्रे असतात. ज्यामुळे हवेचे परिसंचरण व्यवस्थित होऊन पाणी थंड होते. पण भांडे जुने झाल्यावर त्यात घाण साचून ती छिद्रांत अडकते. त्यामुळे पाणी थंड होऊ शकत नाही. अशा स्थितीत जर तुम्ही मातीच भांड दररोज स्वच्छ करुन नीट घासले तर पाणी थंड होण्यास मदत होईल.
७. माठ वापरण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका स्पंजवर एक चमचा मीठ घ्या. मिठाने माठ स्वच्छ घासून घ्यावा. नंतर पाण्याने माठ स्वच्छ धुवून घ्या. यामुळे माठातील बंद झालेली छिद्र उघडून आतील पाणी दीर्घकाळ थंड राहण्यास मदत होईल.
८. माठ राहील इतक्या मोठ्या टबमध्ये माठ अर्धा पाण्यांत बुडेल इतके पाणी भरुन घ्यावे. त्यानंतर त्यात माठ ठेवून द्यावा. मग या माठात पाणी भरून ठेवावे. हा माठ ३ ते ४ तास या टबमध्येच बुडवून ठेवावा. जेणेकरून, पाणी थंड राहील.
९. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी आपण वाळूचा देखील वापर करु शकता. यासाठी एका भांड्यात वाळू भरून ठेवा. त्या वाळूवर मडके ठेवा. वाळूच्या थंडाव्यामुळे मडक्यातील पाणी थंड राहील. शिवाय मडके फुटणार नाही.
१०. आपण मडक्याला कापडाची गोणी देखील गुंडाळून ठेवू शकता. यासाठी गोणी भिजवून घ्यावी आणि ती मडक्याच्या भोवती गुंडाळावी यामुळे देखील मडक्यातील पाणी थंड राहते.