कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

Published:October 28, 2023 12:54 PM2023-10-28T12:54:57+5:302023-10-28T13:04:01+5:30

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

कोजागरीनिमित्त अनेक जण आपल्या घरी, गच्चीवर, टेरेसमध्ये, अंगणात छोटेखानी पार्टीचे आयोजन करतात. यात मसाला दूध हा एक मुख्य पदार्थ तर असतोच, पण त्यासोबत काहीतरी स्नॅक्सही दिलं जातं.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

हे स्नॅक्स असं असावं जे करायला आणि सर्व्ह करायला सोपं असलं पाहिजे. जेणेकरून जिच्या घरी पार्टी होणार आहे, तिलाही त्या पार्टीचा आनंद घेता येईल. नाहीतर मग तिचा सगळा वेळ स्वयंपाक घरात आणि पदार्थ सर्व्ह करण्यात जातो.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

त्यामुळे आता असे काही सोपे पदार्थ पाहा ज्याची सगळी तयारी तुम्ही आधी करून घेऊ शकता. कोजागरी पार्टीसाठी येताना बहुतांश जण रात्रीचे जेवण करून येतात. त्यामुळे दूध आणि त्यासोबत काहीतरी स्नॅक्स असं देणं अपेक्षित आहे. म्हणूनच हे काही साधे सोपे स्नॅक्सचे प्रकार तुम्ही देऊ शकता..

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

यात सॅण्डविज हा एक सोपा प्रकार आहे. सॅण्डविजसाठी भाज्या आगोदर कापून ठेवा. हिरवी चटणी करून ठेवा. सॉस, चटणी, चीज असं सगळं वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भरून तयार ठेवा. म्हणजे आयत्यावेळी पटापट सॅण्डविज लावता येतील.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

इडली सांबार हा आणखी एक मेन्यू. इडली आणि सांबार आधीच करून ठेवा. आयत्यावेळी सांबार गरम करा. म्हणजे मग सांबार गरमागरम असला तरी थंड इडली चालून जाते.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

मसाला पाव हा आणखी एक चांगला पर्याय आहे. यासाठी पावामध्ये भाजी भरून ठेवा. आयत्यावेळी फक्त बटर लावून पाव भाजून घ्या.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

मिसळपाव देखील अनेकांना आवडते. मिसळ आधीच करून ठेवा. मिसळपाव सोबतचे पाव भाजण्याची गरज नसतेच. त्यामुळे हा देखील एक सोपा पदार्थ आहे.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

मुगाच्या डाळीचे वडे, उडीद डाळीचे वडे किंवा मिश्र डाळींचे वडे हा देखील एक चांगला पर्याय आहे. दूधासोबत गरमागरम वडे किंवा भजी छानच लागतील.