kojagiri pournima 2024 special, 5 favourite snacks with milk for kojagiri pounima celebration
कोजागरी पौर्णिमा: खास जागरणासाठी ५ पदार्थ-मसाला दुध आणि चटपटीत खाऊ! यादगार होईल पार्टीPublished:October 16, 2024 11:59 AM2024-10-16T11:59:38+5:302024-10-16T19:45:32+5:30Join usJoin usNext कोजागरी पौर्णिमेसाठी बरेचजण छोटेखानी कार्यक्रम करतात. सोसायटीमधले, अपार्टमेंटमधले लोक एकत्र येतात. काही मित्रमंडळी एकत्र जमतात आणि मग गप्पा- टप्पा, गाणी असा छान कार्यक्रम जुळून येतो. रात्री बारा वाजता दुधाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता होते..(kojagri pounima celebration) त्यानिमित्ताने आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी दुधासोबतच काहीतरी हलकाफुलका नाश्ता द्यायचा असेल तर कोणकोणते पदार्थ करता येऊ शकतात (5 favourite snacks with milk for kojagri), याविषयीच्या काही आयडिया पाहा..(kojagri pournima 2024 special) बऱ्याचदा असं होतं की जेवण करून साधारण साडेनऊ दहाच्या आसपास लोक एकत्र येतात. त्यामुळे दुधासोबत कोणतेही जड पदार्थ खायला नको वाटते. अशावेळी तुमचा मेन्यू एकदम हलकाफुलका असायला हवा. म्हणूनच या काही पदार्थांचा तुम्ही स्नॅक्स म्हणून नक्कीच विचार करू शकता. पहिला पदार्थ म्हणजे भेळ. भेळ हा अनेकांचा ऑल टाइम फेवरेट पदार्थ. शिवाय योग्य प्रमाणात भेळ दिली तर ती अजिबात जड होत नाही. मुरमुरे, मखाना, ओट्स भेळ असे पौष्टिक पर्याय तुम्ही देऊ शकता. चिप्स, चकल्या, शेव, बाकरवडी अशा पदार्थांचाही तुम्ही विचार करू शकता. दुधासोबत तोंडी लावायला असे खमंग पदार्थ असतील तर गप्पा अधिक खुसखुशीत होतील. पापडी चाट, पुरी चाट, कटोरी चाट अशा पदार्थांचाही तुम्ही विचार करू शकता. गरमागरम मसाला पावही देऊ शकता. यासाठी पावभाजीची भाजी तयार करून ठेवा आणि दोन पावांच्यामध्ये ती भाजी घालून बटर लावून पाव दोन्ही बाजूंनी खमंग भाजा. हा पदार्थ अनेकांना खूप आवडतो. कोथिंबीर वडी, ढोकळा, मसाला इडली अशा पदार्थांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. हे हलकेफुलके पदार्थ आवडीने खाल्ले जातात.टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कोजागिरीfoodCooking Tipskojagari