भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

Updated:March 21, 2025 17:45 IST2025-03-20T10:04:25+5:302025-03-21T17:45:05+5:30

Look at the amazing variety of stuffed vegetables, tasty and delicious : भरल्या भाज्यांची मेजवानी. पाहा काय चविष्ट असतो हा प्रकार. बघूनच तोंडाला पाणी सुटेल.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

भारतामध्ये भाजी तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामधील एक पद्धत म्हणजे भाजीमध्ये सारण भरून केलेली भरली भाजी.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

भाज्यांमध्ये विविध प्रकारचे सारण भरून त्या भरलेल्या भाज्या शिजवल्या जातात. त्या सारणामध्ये नारळ, खोबरं, अनेक मसाले यांचा वापर केलेला असतो. चवीला हा प्रकार फारच छान असतो.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

महाराष्ट्रामध्ये काही ठराविक भाज्यांचा वापर करून भरली भाजी तयार केली जाते. यामध्ये या काही भाज्यांचा समावेश आहे.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

१. सर्वांनाच माहिती असेल अशी एक भाजी म्हणजे भरलं वांग. वांग्यामध्ये नारळाचा मसाला भरून वांगं शिजवलं जातं. भरलं वांग अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आहे.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

२. तोंडली आकाराला जरी लहान असली, तरी तोंडलीला चिर देऊन नंतर त्यामध्ये सारण भरायचे. यासाठी दाण्याचे कुट वापरता येते. नारळ वापरता येतो.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

३. भरलेली सिमला मिरची समारंभांमध्ये पाहायला मिळते. ती तयार करायलाही फार सोपी आहे. सारण तयार करताना भरपूर मसाले वापरून तयार करा. खरी मज्जा त्या सारणामध्येच असते.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

४. बाजारात अनेक प्रकारच्या मिरच्या मिळतात. त्यामध्येच एक जाड व पोपटी रंगाची मिरचीही मिळते. त्याच मिरचीचा वापर करून भरली मिरची तयार करता येते.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

५. ढेमसे अनेकांना माहितीच नसते. पण ढेमस्याची भाजी फार पौष्टिक असते. ढेमस्यामध्ये विविध प्रकारचे मसाले भरून नंतर ते तेलावर परतले जाते.

भरली वांगी ते भरली ढेमसी! पाहा महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या-भरल्या भाज्यांचे पारंपरिक प्रकार

६. भरलेली भेंडी चवीला प्रचंड सुंदर लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ताव मारत खातात.