Maharashtra din: special maharashrian food, which food is famous in maharashtra?
महाराष्ट्र दिन विशेष: झणझणीत चवीचे खमंग मराठी पदार्थ, जगात चवीला तोड नाही! सांगा, तुम्हाला काय आवडतं?Published:May 1, 2024 11:44 AM2024-05-01T11:44:00+5:302024-05-02T15:21:01+5:30Join usJoin usNext महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश या प्रत्येक ठिकाणचा कोणता ना कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे. बघा सगळ्या जगाला भुरळ पाडणारे मराठमोळे पदार्थ कोणते... पुरणपोळी या पदार्थाशिवाय तर महाराष्ट्रातले कित्येक सणवार अपूर्णच आहेत. त्यामुळे पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची ओळख. पुरणपोळीसोबत हमखास कटाची आमटी केली जाते. आमटी करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असली तरी ती पुरणपोळीसोबत असतेच. बऱ्याच जणांना माहिती नाही पण श्रीखंड हे मुळचे महाराष्ट्राचेच आहे. उकडीचे मोदक हा आणखी एक मराठी पदार्थ. जगभरात याचे अनेक खवय्ये आहेत. पिठलं भाकरी म्हणजेच झुणका भाकर ही देखील महाराष्ट्राची ओळख. कमीतकमी किमतीत चवदार झुणका भाकर खायची असेल तर महाराष्ट्रातच यावे लागेल. हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून केलेला ठेचा हा देखील मुळचा महाराष्ट्राचाच आहे. ज्वारीचे पीठ, डाळीचे पीठ आणि कणिक घालून केलेले शेंगोळे तुम्हाला महाराष्ट्रातच खायला मिळतील. हल्ली इंडियन पास्ता म्हणूनही हा पदार्थ ओळखला जातो. महाराष्ट्राचा वडापाव तर जगभरातील खवय्यांना आवडतो. मिसळ हा पदार्थ मुळचा महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागातला हा नेहमीच महाराष्ट्रातल्या खवय्यांसाठी वादाचा विषय आहे. पण जगासाठी ती महाराष्ट्राचीच ओळख आहे. पातोड्यांची आमटी किंवा आमटी पातोडे हा काळ्या मसाल्याचा पदार्थ महाराष्ट्रात येऊनच खायला हवा. नागपुडी वडाभात खायला तर देशभरातले खवय्ये नागपूर गाठतात. सांबार वडी हा देखील तिथलाच एक अतिशय लोकप्रिय पदार्थ. टॅग्स :अन्नमहाराष्ट्रfoodMaharashtra