महाराष्ट्र दिन विशेष: झणझणीत चवीचे खमंग मराठी पदार्थ, जगात चवीला तोड नाही! सांगा, तुम्हाला काय आवडतं? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2024 11:44 AM 1 / 13महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश या प्रत्येक ठिकाणचा कोणता ना कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे. बघा सगळ्या जगाला भुरळ पाडणारे मराठमोळे पदार्थ कोणते...2 / 13पुरणपोळी या पदार्थाशिवाय तर महाराष्ट्रातले कित्येक सणवार अपूर्णच आहेत. त्यामुळे पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची ओळख.3 / 13पुरणपोळीसोबत हमखास कटाची आमटी केली जाते. आमटी करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असली तरी ती पुरणपोळीसोबत असतेच.4 / 13बऱ्याच जणांना माहिती नाही पण श्रीखंड हे मुळचे महाराष्ट्राचेच आहे.5 / 13उकडीचे मोदक हा आणखी एक मराठी पदार्थ. जगभरात याचे अनेक खवय्ये आहेत.6 / 13पिठलं भाकरी म्हणजेच झुणका भाकर ही देखील महाराष्ट्राची ओळख. कमीतकमी किमतीत चवदार झुणका भाकर खायची असेल तर महाराष्ट्रातच यावे लागेल.7 / 13हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून केलेला ठेचा हा देखील मुळचा महाराष्ट्राचाच आहे.8 / 13ज्वारीचे पीठ, डाळीचे पीठ आणि कणिक घालून केलेले शेंगोळे तुम्हाला महाराष्ट्रातच खायला मिळतील. हल्ली इंडियन पास्ता म्हणूनही हा पदार्थ ओळखला जातो.9 / 13महाराष्ट्राचा वडापाव तर जगभरातील खवय्यांना आवडतो.10 / 13मिसळ हा पदार्थ मुळचा महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागातला हा नेहमीच महाराष्ट्रातल्या खवय्यांसाठी वादाचा विषय आहे. पण जगासाठी ती महाराष्ट्राचीच ओळख आहे. 11 / 13पातोड्यांची आमटी किंवा आमटी पातोडे हा काळ्या मसाल्याचा पदार्थ महाराष्ट्रात येऊनच खायला हवा.12 / 13नागपुडी वडाभात खायला तर देशभरातले खवय्ये नागपूर गाठतात. 13 / 13सांबार वडी हा देखील तिथलाच एक अतिशय लोकप्रिय पदार्थ. आणखी वाचा Subscribe to Notifications