Join us

मकर संक्रांत स्पेशल : ७ प्रकारचे तिळगुळाचे लाडू आणि वड्या; पाहा यंदा तुम्ही कोणते प्रकार करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 11:46 IST

1 / 9
१. संक्रांतीचा सण आता अवघ्या २ दिवसांवर आला आहे. त्यात त्यादिवशी रविवारची सुटी असल्याने कुणालाही ऑफिसची घाई नाही. त्यामुळे संक्रांतीचा सण आणि जेवण कसं मनाप्रमाणे सगळ्यांसोबत साजरं करता येईल.
2 / 9
२. आता या दिवशी तीळ- गुळाचं विशेष महत्त्व. तीळ गुळाचे लाडू- वड्या आणि पापड करण्याच्या अनेक पद्धती. यावर्षी नेमक्या कोणत्या पद्धतीच्या वड्या कराव्यात किंवा लाडू करावेत, असा प्रश्न पडला असेल तर ही यादी एकदा बघून घ्या. यातून संक्रांतीचा गोड पदार्थ कसा करायचा, हे ठरवणं नक्कीच सोपं होऊ शकतं.
3 / 9
३. खाेबरं, शेंगदाणे, तीळ हे साहित्य वापरून झटपट लाडू करता येतात. यासाठी गुळाचा किंवा साखरेचा पाक करण्याची अजिबात गरज नाही. वेळ कमी असेल तर हा पर्याय चांगला राहील.
4 / 9
४. गुळाचा पाक आणि भाजलेले तीळ यांचा वापर करून असे पाकातले तिळाचे लाडू करता येतात.
5 / 9
५. काही जण गुळाचा पाक करण्याऐवजी साखरेचा पाक करूनही तिळाचे लाडू वळतात. दोन्हीची रेसिपी सारखीच आहे. फक्त गुळाऐवजी साखर वापरायची.
6 / 9
६. काही सुगरण मैत्रिणी गुळाचा पाक आणि भाजलेले तीळ वापरून अशी पातळ वडीही करतात. ही वडी सारण गरम गरम असतानाच लाटून केली जाते. त्यामुळे त्या सुगरणीची खरी कसोटी लागते.
7 / 9
७. भाजलेले तीळ आणि खजूर यांच्यापासून असा पौष्टिक तीळ- खजूर लाडूही करता येतो.
8 / 9
८. खोबरं, शेंगदाणे आणि गुळ याऐवजी सुकामेवा आणि खजूर घालूनही तिळाचे लाडू केले जातात.
9 / 9
९. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही व्हाईट चॉकलेट, ताहिनी सॉस आणि बटर घालून तिळाचे पौष्टिक चॉकलेट ट्रफल्स तयार केले आहेत. ती रेसिपीही सध्या व्हायरल होत आहे. तशा पद्धतीने केलेले लाडू पौष्टिक तर आहेतच पण चवीलाही उत्तम आहेत.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मकर संक्रांती