हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

Updated:April 18, 2025 17:44 IST2025-04-17T16:10:40+5:302025-04-18T17:44:42+5:30

Mango Varieties : famous mango varieties in India and how to identify them : How many varieties of Mango are found in India : Best Famous Mango Varieties in India : Mango varieties that define the flavors of India : पिवळ्याधमक आंब्याचे वेगवेगळे प्रकार आणि ते भारतातील कोणत्या राज्यांत पिकवले जातात, ते पाहा...

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

उन्हाळा म्हटलं की सगळ्यांत आधी आपल्याला (Best Famous Mango Varieties in India) आंब्याचा सिझन आठवतो. वर्षातून अवघे ३ ते ४ महिने खाता येणारा हा फळांचा राजा म्हणजे सगळ्यांचे पहिले प्रेम. खरंतर, आंब्याचे वेगवेगळे प्रकार भारतातील वेगवेगळ्या राज्यांत पिकवले जातात.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

या पिवळ्याधमक आंब्याचे वेगवेगळे प्रकार आणि ते भारतातील ( Best Famous Mango Varieties in India) कोणकोणत्या राज्यांत पिकवले जातात, तसेच कोणत्या हंगामात त्यांची चव चाखता येते ते पाहूयात.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

१. भारतातील महाराष्ट्र राज्यांतील वेगवेगळ्या भागात हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. आंब्याच्या वेगवेगळ्या जातींपैकी हापूस आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. एप्रिल ते जून महिन्यांत हा आंबा फार मोठया प्रमाणावर विकला जातो. तसेच पायरी आंबा देखील फार लोकप्रिय आहे, मे ते जून महिन्याच्या सुरुवातील या आंब्याची गोड चव चाखता येते.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

२. गुजरात राज्यांत मे ते जुलै महिन्यांत गीर केसर हा आंब्याचा प्रकार फार मोठया प्रमाणावर खाल्ला जातो. तसेच एप्रिल ते जून महिन्यात राजापुरी आंब्याला फार मोठ्या प्रमाणांत मागणी असते.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

३. उत्तर प्रदेशचा दशहरी आणि लंगरा या दोन्ही आंब्याच्या जाती अगदी देशभरात लोकप्रिय आहे. दशहरी जून ते जुलै तर लंगरा जून महिन्याच्या शेवटापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या काळात या आंब्याची चव चाखता येते.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

४. वेस्ट बंगाल भागातील हिमसागर आणि फझली या दोन्ही प्रकारच्या आंब्याची चव अगदी सुरेख असते. मे ते जून महिन्यांत हिमसागर तर जुलै ते ऑगस्ट महिन्यात फझली आंब्याची चव चाखता येते.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

५. बैंगनपल्ली आणि सुवर्णरेखा या आंब्याच्या दोन्ही जाती अतिशय लोकप्रिय आहे. मे ते जून महिना या सिझनमध्ये आंब्याच्या या दोन्ही प्रकारची चव चाखता येते.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

६. तामिळनाडूचा हिमायत आणि मालगोवा अशा आंब्याच्या दोन जाती फारच लोकप्रिय आहेत. मे ते जून महिन्यात हिमायत तर जून ते जुलै महिन्यात मालगोवा आंबा फार मोठ्या प्रमाणांत खाल्ला जातो.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

७. कर्नाटकची खासियत असलेला रसपुरी आणि बदामी अशा आंब्याच्या दोन्ही जाती चवीला खूपच खास आहेत. एप्रिल ते जून महिन्यात आंब्याचे हे दोन्ही प्रकार कर्नाटकसहित संपूर्ण देशभरात खाल्ले जातात.

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

८. केरळमध्ये मोवंडंन आणि किलीचुंडन असे आंब्याचे दोन्ही प्रकार अतिशय लोकप्रिय आहेत. जून ते ऑगस्ट महिन्यांत मोवंडंन तर मे ते जुलै महिन्यांत किलीचुंडन अशा दोन्ही प्रकारच्या आंब्याची चव चाखता येते.