मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

Published:December 4, 2024 12:10 PM2024-12-04T12:10:24+5:302024-12-04T12:16:02+5:30

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून या महिन्यातला पहिला गुरुवार अगदी उद्याच आहे. त्यामुळे महालक्ष्मीची भक्तीभावाने उपासना करणाऱ्या महिलांमध्ये सध्या खूपच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे.

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

पुजेची तयारी केल्यानंतर देवीच्या नैवेद्यासाठी काय गोड पदार्थ करावा, असा प्रश्न प्रत्येकीला पडतोच. कारण या महिन्यात दर गुरुवारी सायंकाळी देवीसाठी काहीतरी गोड नैवेद्य करावा लागतो. म्हणूनच आता असे काही पदार्थ बघा जे अगदी झटपट होतील आणि त्यासाठी तुम्हाला खूप काही तयारी करावी लागणार नाही..

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

पहिला पदार्थ आहे बासुंदी. दुधाची घट्ट बासुंदी किंवा रबडी करणं हे खूप साेपं काम आहे. यासाठी तुम्हाला फक्त दूध उकळत ठेवावं लागतं. त्यात हात घालून अडकून बसण्याची काहीच गरज नसते. त्यामुळे पहिल्या गुरुवारी तुम्ही बासुंदी किंवा रबडीचा नैवेद्य करू शकता.

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

नैवेद्याला करता येण्यासारखा दुसरा गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. जर बाजारातून पाणी कमी असणारं घट्ट चक्का दही आणलं तर त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकणं खूपच सोपं होतं आणि अगदी ५ मिनिटांत श्रीखंड तयार होतं.

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

सध्या बाजारात लालचुटूक गाजर भरपूर प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे गाजराचा हलवा देखील तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी करू शकता.

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

रव्याचा शिरा हा नैवेद्यासाठी आणखी एक सोपा पर्याय आहे. एक वाटी साजूक तुपातला शिरा झटपट होतो आणि घरातल्या सगळ्यांनाही आवडतो.

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी

शेवयाची खीर हा देखील देवीच्या नैवेद्यासाठी एक झटपट होणारा सोपा पदार्थ आहे. शेवयाची खीर करण्यासाठी खूप काही तयारी करावी लागत नाही.