५ पोटभरीचे पौष्टिक पर्याय, पोट तर भरेल - वजनही वाढणार नाही, भूक भूकही होत नाही... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 4:02 PM 1 / 6सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यात बरेच अंतर असते. या वेळात आपल्याला बरेचदा खूप भूक लागते. अशावेळी या छोट्या भुकेसाठी नेमकं काय खावं असा प्रश्न पडतो. शक्यतो या मधल्या वेळी भूक लागली तर आपण काहीतरी अरबट - चरबट खातो. परंतु असे स्नॅक्सचे पदार्थ खाणे कधीतरी ठिक आहे. परंतु रोज असे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते. या मधल्या वेळेच्या भुकेसाठी आपण चिवडा, वेफर्स, फरसाण, सामोसे, वडापाव असे अनेक स्नॅक्सचे पदार्थ आवडीने खातो. परंतु रोज असे तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडू शकते सोबतच वजन वाढीची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी मिड डे मिल म्हणजेच सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामधील छोट्या भुकेसाठी आपण काही हेल्दी खाण्याचे पर्याय निवडू शकतो. हे हेल्दी पदार्थ खाऊन तुमची छोटीशी भूकही भागवली जाईल आणि आरोग्याच्या दृष्टीने ते हेल्दी असेल. मिड डे मिल म्हणून खाता येतील असे काही हेल्दी स्नॅक्सचे पर्याय पाहूयात(5 Healthy Snack For Mid-Meal Cravings).2 / 6मिड डे मिलसाठी मखाणा चाट हा एक उत्तम पर्याय आहे. हे मखाने आपण वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. मखाण्याची भेळ, मखाण्याचा चिवडा, चाट असे अनेक पदार्थ तुम्ही खाऊ शकता. थोड्याशा तेलात मखाणे हलकेच भाजून घ्यावेत त्यानंतर त्यावर चाट मसाला, मीठ घालून खाण्यासाठी सर्व्ह करावेत. मखाण्यांमध्ये कॅल्शियमसोबत फायबर आणि मॅग्नेशियम देखील असते. हे खाल्ल्याने हाडे मजबूत आणि दिवसभर अॅक्टिव्ह राखण्यास मदत मिळते. मखाणे खाल्ल्याने पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. 3 / 6मिड-डे स्नॅक म्हणून तुम्ही फ्रूट स्मूदी देखील खाऊ शकता. यामुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर फ्रूट स्मूदी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही खजूर किंवा चिया सीड्स पासून तयार केलेली कोणतीही स्मूदी पिऊ शकता. फ्रूट स्मूदी प्यायल्याने तुम्हाला लवकर भूक लागणार नाही आणि तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहाल.4 / 6मिड - डे स्नॅक्ससाठी फ्रूट चाट देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचे मिक्स फ्रूट चाट खाऊ शकता. याशिवाय तुम्हाला जी फळं आवडत असतील ती फळं खावीत. दररोज फळं खाल्ल्याने आपल्या शरीरातील जीवनसत्वाची कमतरता देखील भरुन काढली जाईल. फळं खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागणार नाही आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल.5 / 6मिड-डे स्नॅक्ससाठी सूप हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला खूप भूक नसेल तर तुम्ही सूप घेऊ शकता. सूपमध्ये तुम्ही टोमॅटो सूप, स्वीट कॉर्न सूप किंवा मिक्स्ड व्हेजिटेबल सूप पिऊ शकता. सूप प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि पोट भरून राहण्यास मदत होईल. 6 / 6नाश्ता आणि दुपारच्या जेवणा दरम्यान जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही सॅलॅड खाऊ शकता. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. यामुळे तुमच्या शरीराला फायबर मिळेल आणि तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहाल. आणखी वाचा Subscribe to Notifications