most viral kitchen tips in 2024, have you tried this most viral kitchen hacks in 2024?
२०२४ मध्ये ‘या’ किचन टिप्स झाल्या सर्वाधिक व्हायरल, सांगा तुम्हाला यापैकी किती माहिती आहेत?Published:December 9, 2024 04:33 PM2024-12-09T16:33:42+5:302024-12-10T17:10:37+5:30Join usJoin usNext महिला किंवा स्वयंपाक करणारा प्रत्येक व्यक्तीच नेहमीच वेगवेगळ्या कुकिंग टिप्स, किचन टिप्सच्या शोधात असताे. कारण काम सोपं आणि झटपट होण्यासाठी त्या खूप उपयुक्त ठरतात. गुगलने अशा काही किचन टिप्स शेअर केल्या आहेत ज्या २०२४ या वर्षात खूप जास्त व्हायरल झाल्या.. त्या टिप्स नेमक्या कोणत्या आणि तुम्हाला त्यापैकी किती माहिती आहेत बघा बरं.. त्यापैकी सगळ्यात जास्त व्हायरल झालेली गोष्ट म्हणजे भाजीत तेल जर जास्त झालं असेल तर ते कसं कमी करावं... याचा उपाय तुम्हाला माहिती आहे का त्या खालोखाल व्हायरल झालेली ट्रिक म्हणजे तेल न सांडता पाकिटातून बाटलीमध्ये कसं भरावं.. पोळपाटाशिवाय परफेक्ट गोलाकार पुऱ्या कशा कराव्या, याची माहितीही खूप महिलांनी यावर्षी गुगलसर्च करून घेतली. बऱ्याच रेसिपीमध्ये लसूण लागतोच. त्यामुळेच झटपट लसूण कसा सोलायचा याची माहितीही पुष्कळ महिलांनी घेतली एका डब्यातून दुसऱ्या डब्यात पीठ भरत असताना ते फरशीवर, ओट्यावर सांडू नये म्हणून काय करावं याविषयीच्या ट्रिक्सही खूप व्हायरल झाल्या. फळं आणि भाज्या जास्तीतजास्त दिवस टिकण्यासाठी काय करावे, याची माहिती घेणाऱ्या महिलाही भरपूर होत्या. त्या खालोखालच कढीपत्त्याची पानं ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी काय युक्ती करावी, याची ट्रिकही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. मशरूम व्यवस्थित शिजण्यासाठी काय करावं याविषयी जाणून घेण्यासाठीही अनेक महिला उत्सूक होत्या. उन्हाळ्यात प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी माठातल्या पाण्याप्रमाणे थंड राहावे म्हणून काय करावे, याचा एका खेडेगावातल्या महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओही यावर्षी खूप व्हायला झाला.टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सfoodCooking Tipskitchen tips