१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी Published:October 17, 2023 12:08 PM 2023-10-17T12:08:00+5:30 2023-10-17T12:10:02+5:30
Navratri Special How to Make Sabudana Rings : साबुदाणे वडे बनवण्यात जास्त वेळ जातो, भरपूर तेल लागतं आणि वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून लोक साबुदाणा वडा घरी बनवणं टाळतात किंवा खूप कमी वेळा घरी हा पदार्थ करतात. नवरात्राच्या (Navratri 2023) ९ दिवसांत अनेकजण उपवासाचे पदार्थ खातात तर काहीजण फक्त फळं खाऊन उपवास करतात. उपवासाला खाल्ला जाणार सगळ्यात कॉमन पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी रोज रोज नको वाटते.
साबुदाणे वडे बनवण्यात जास्त वेळ जातो, भरपूर तेल लागतं आणि वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून लोक साबुदाणा वडा घरी बनवणं टाळतात किंवा खूप कमी वेळा घरी हा पदार्थ करतात.
वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून तुम्ही पटकन सोपी, खमंग डिश बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही फक्त खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१) १ वाटी साबुदाण्यात एका उकडून, मॅश करून घेतलेला बटाटा घाला. २ दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ, मिरच्यांचे काप, बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कुट, लिंबू, मीठ आणि लाल तिखट, जीरं घालून हे सर्व जिन्नस एकजीव करा आणि छान गोळा बनवून घ्या.
२) मऊ गोळा तयार करण्यासाठी तुम्ही तेलाचा हात लावू शकता. पीठाचा गोळा तयार केल्यानंतर एखाद्या रिंगप्रमाणे आकार देऊ शकता.
३) रिंगसारखा परफेक्ट आकार येण्यासाठी एखादा ग्लास किंवा वाटी घेऊन त्याभोवती हे मिश्रण गोलाकार तयार करून घ्या. त्यानंतर ग्लास वर उचला. तुम्हाला रिंगप्रमाणे परफेक्ट गोल आकार मिळेल.
४) तेल गरम झाल्यानंतर या रिंग्स गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. साबुदाणा रिंग्स तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.