Join us   

१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:08 PM

1 / 7
नवरात्राच्या (Navratri 2023) ९ दिवसांत अनेकजण उपवासाचे पदार्थ खातात तर काहीजण फक्त फळं खाऊन उपवास करतात. उपवासाला खाल्ला जाणार सगळ्यात कॉमन पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी रोज रोज नको वाटते.
2 / 7
साबुदाणे वडे बनवण्यात जास्त वेळ जातो, भरपूर तेल लागतं आणि वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून लोक साबुदाणा वडा घरी बनवणं टाळतात किंवा खूप कमी वेळा घरी हा पदार्थ करतात.
3 / 7
वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून तुम्ही पटकन सोपी, खमंग डिश बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही फक्त खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
4 / 7
१) १ वाटी साबुदाण्यात एका उकडून, मॅश करून घेतलेला बटाटा घाला. २ दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ, मिरच्यांचे काप, बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कुट, लिंबू, मीठ आणि लाल तिखट, जीरं घालून हे सर्व जिन्नस एकजीव करा आणि छान गोळा बनवून घ्या.
5 / 7
२) मऊ गोळा तयार करण्यासाठी तुम्ही तेलाचा हात लावू शकता. पीठाचा गोळा तयार केल्यानंतर एखाद्या रिंगप्रमाणे आकार देऊ शकता.
6 / 7
३) रिंगसारखा परफेक्ट आकार येण्यासाठी एखादा ग्लास किंवा वाटी घेऊन त्याभोवती हे मिश्रण गोलाकार तयार करून घ्या. त्यानंतर ग्लास वर उचला. तुम्हाला रिंगप्रमाणे परफेक्ट गोल आकार मिळेल.
7 / 7
४) तेल गरम झाल्यानंतर या रिंग्स गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. साबुदाणा रिंग्स तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सनवरात्रीशारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री गरबा २०२३