Join us   

माहूर गडावर मिळतो तसा तांबूल घरी करायचा? बघा सोपी रेसिपी, १० मिनिटांत तांबूल तयार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2024 5:33 PM

1 / 7
नवरात्रीमध्ये तांबूल, पानांचा विडा या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. विडा तर आपण नेहमीच करतो, पण बऱ्याचदा माहूर गडावर मिळतो तसा छान, सुवासिक तांबूल खाण्याची इच्छा होतेच.. (simple and easy tambul recipe)
2 / 7
आता नवरात्रीनिमित्त घरी तांबूल करण्याचा विचार असेल (Navratri 2024) आणि आपल्या घरचा तांबूल थेट माहूर गडावर मिळतो, तशाच चवीचा व्हावा, असं वाटत असेल तर एकदा ही रेसिपी पाहून तांबूल करून पाहा.. (how to make tambul?)
3 / 7
तांबूल करण्यासाठी सगळ्यात आधी २५ ते ३० विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची देठं काढून घ्या.
4 / 7
त्यानंतर विड्याच्या पानांचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये टाका.
5 / 7
त्यामध्ये थोडासा कात, थोडा चुना, ३ ते ४ टेबलस्पून बडिशेप, २ टेबलस्पून गुलकंद आणि १ टेबलस्पून किसलेलं खोबरं टाका.
6 / 7
त्यातच ४ ते ५ वेलची आणि ४ ते ५ लवंग टाका. पण ते टाकताना थोडेसे कुटून टाका.
7 / 7
यानंतर सगळं मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. तांबूल अगदी बारीक पेस्ट करू नये. थोडा जाडा- भरडाच असावा. या पद्धतीने तांबूल करणे अतिशय सोपे तर आहे. तांबूलाची चवही खूपच छान लागते.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीअन्न